pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri : पवना धरण १०० टक्के भरले ; नोव्हेंबरपासून दररोज पाणीपुरवठा

आणखी पाच ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असते. तरी सध्या दररोज पाणीपुरवठा करता येणार नाही. नवीन यंत्रणा उपलब्ध केली जात आहे. नोव्हेंबरपासून दररोज पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. निगडी प्राधिकरणात चोवीस तास पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी पाच ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर २०१९ पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. आज मितीला धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम ठेवला. पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले होते.

याबाबत आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘पाणीपुरवठा नियमित करा असे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. सध्या दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. नोव्हेंबरपासून दररोज पाणीपुरवठा करता येईल. निगडी, प्राधिकरणात चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुरु केली आहे. मागील तीन महिन्यांपासून ही योजना कार्यान्वित आहे. त्यासाठी पहिले एक महिना जास्त पाणी लागते. त्यानंतर कमी पाणी लागते. आणखी पाच ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT