pimpri Crime  sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Crime : जयपूरमध्ये आरोपींना पकडण्यासाठी गेलेला पिंपरीतील पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

Pimpri Crime : जयपूरमध्ये सायबर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड सायबर सेलच्या सहाय्यक निरीक्षकावर मोटार घालून आरोपींनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी फरार झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सायबर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी राजस्थानातील जयपूरमध्ये गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील सायबर सेल विभागाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या अंगावर आरोपींनी मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी जयपूर येथील पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण शिवहार स्वामी (वय ३६, रा. गहुंजे) यांनी फिर्याद दिली आहे. पंधरा दिवसांपूर्वी सायबर गुन्ह्यात पोलिस अटक करतील, अशी भीती दाखवून १ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी करून, इतर आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी - चिंचवड सायबर पोलिसांचे एक पथक जयपूर येथे गेले होते. तेथे आरोपी मयंक गोयल याला अटक केली.

मयंकच्या मदतीने अक्षत गोयलचा शोध पोलिस घेत होते. दरम्यान, अक्षत हा जयपूरला असल्याची माहिती मिळाली असता, त्याला पकडण्यासाठी सायबर पोलिसांनी सापळा रचला. अक्षत हा त्याच्या इतर तीन मित्रांसह काळ्या रंगाच्या मोटारीत बसला होता. पोलिस शिपाई अतुल लोखंडे यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांनी मोटारीला घेराव घालून आरोपीला खाली उतरण्यास सांगितले.

यावेळी सहायक निरीक्षक स्वामी हे मोटारीसमोर उभे राहिले. दरम्यान, आरोपींनी मोटार थेट स्वामी यांच्या अंगावर घालत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुमारे दहा ते बारा किलोमीटरपर्यंत आरोपींचा पाठलाग केला. मात्र, आरोपींनी एका ठिकाणी मोटार थांबवून ते पसार झाले. स्थानिक पोलिसांनी मोटार ताब्यात घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT