Sakal Vidya Edu Expo sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vidya Edu Expo : करिअरबाबत विद्यार्थी आणि पालकांना शनिवारपासून मार्गदर्शन

दहावी, बारावी बरोबरच ‘सीईटी’चा निकालही लागला आहे. त्यामुळे आता पुढे काय?... असे प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहेत. त्यांचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - दहावी, बारावी बरोबरच ‘सीईटी’चा निकालही लागला आहे. त्यामुळे आता पुढे काय?... असे प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहेत. त्यांचे उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण, करिअरबाबत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ अंतर्गत शनिवार (ता. १७) व रविवारी (ता. १८) चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये केले आहे.

दहावी-बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात चिंता आहे. कोणत्या शाखेत ॲडमिशन घ्यायचं? करिअर कशात करायचं? काहींनी ठरवलेलंही असेल. काहींना करिअरबाबत कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं?, असाही प्रश्न पडलेला असेल. त्यामुळेच दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ‘सकाळ’तर्फे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केले आहे. तीही अगदी विनामूल्य!

काय? कधी? केव्हा? कुठे?

काय? : सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो

कधी? : १७ व १८ जून २०२३

केव्हा? : सकाळी १० ते रात्री ८

कुठे? : ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

काय सांगता?

आता घेता येईल करिअरचा योग्य निर्णय

दहावी, बारावीनंतर ठरवा करिअरची दिशा

शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच छताखाली

विविध क्षेत्रांतील करिअरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अधिक माहितीसाठी

संपर्क : ८३७८९८७८३६

शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात...

दहावी-बारावीच्या निकालानंतर वेध लागतात ते महाविद्यालयीन शिक्षणाचे आणि करिअरची नेमकी दिशा ठरविण्याचे. अनेकदा विद्यार्थी-पालकांना महाविद्यालय, करिअर निवडताना कसरत करावी लागते किंवा अनेकदा गोंधळ उडतो. आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे.

- डॉ.गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पीसीईटी

‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो’त नामांकित शिक्षण संस्था सहभागी होत आहेत. विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयापासून कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रम, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे.

- धनंजय वर्णेकर, संस्थापक, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल

‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो’त महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध पर्यायांची माहिती मिळते. पॅरामेडिकल, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे.

- डॉ. अरविंद खरात, संचालक, मेडिनोव्हा इन्स्टिट्यूट

सर्व शैक्षणिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील दुवा ठरणार आहे. प्रदर्शनातील स्टॉलद्वारे अनेक क्षेत्रातील करिअर, त्यातील संधी या विषयी व अभ्यासक्रमांबद्दल माहिती मिळणार आहे. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

- प्रा. नौशाद शेख, संस्थापक अध्यक्ष, क्रिएटिव्ह ॲकॅडमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT