पिंपरी-चिंचवड

पिंपरी : विश्रांतीगृहाला एसटी महामंडळाने लावले टाळे

कोकण प्रवासाची सोय करण्यासाठी गाव सोडून आलेल्या ६० मुक्कामी एसटीचालकांना शहरात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोकण प्रवासाची सोय करण्यासाठी गाव सोडून आलेल्या ६० मुक्कामी एसटीचालकांना शहरात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. संपामुळे एसटी महामंडळाने विश्रांतीगृहाला टाळे लावल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दोन वेळेचे जेवण, रात्री विश्रांतीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना मंगळवारी रस्त्यांवर रात्र काढावी लागली. आम्ही आराम कुठे करायचा? असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. संपामुळे त्यांचा मुक्काम वाढल्यामुळे महामंडळाने ही कारवाई केल्‍याचे संपकरांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्र व खानदेश मध्ये जळगांव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जिल्ह्यातील बागलाण, कळवण, मालेगाव आणि नांदगाव या विभागांतून प्रत्येकी १५ बस शहरात दाखल झाल्या आहेत. मागणीनुसार या गाड्यांसह चालक, वाहक, मॅकेनिक असे मागणीनुसार ६० कर्मचारी वल्लभनगर आगारात दाखल झाले. त्यांची राहण्याची व्यवस्था विश्रांतीगृहात केली होती. प्रत्यक्षात त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था काढून घेतली. मंगळवारी रात्री एका विश्रांतीगृहाला टाळे लावले. दुसऱ्यादिवशी बुधवारी (ता.१०) सकाळी नऊ वाजता विश्रांतीगृह कुलूपबंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. त्यांना रात्र रस्त्यावर काढावी लागली व कोरोनासंसर्गाची भीती असताना उघड्यावरील अन्न खावे लागले, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

‘प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची आगाऊ व्यवस्था करणे आवश्यक होते. रात्रभर कर्मचारी अक्षरश: उपाशीपोटी उघड्यावर होते. बाहेरचे जेवणही निकृष्ट व अपुरे असल्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे कर्मचारीही आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ’

- प्रवीण मोहिते, कामगार प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT