Pimpri to Phugewadi metro line soon Will be open to passenger sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार

मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी; प्रवासी वाहतुकीस मान्यता

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. त्याचे दोन मार्ग आहेत. त्यातील एक मार्ग पिंपरी चिंचवड शहराशी संबंधित आहे. पुण्यातील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मधील पिंपरी अर्थात पिंपरी चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) असा हा मार्ग आहे. त्यातील दापोडीपासून महापालिका भवनापर्यंतच्या मार्गाचा समावेश शहरात होतो. या मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी गेल्या महिन्यात त्याची पाहणी केली असून प्रवासी वाहतुकीस मान्यता दिली आहे, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते गरवारे या दोन मार्गिका आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट ही ११.४ किलोमीटरची मार्गिका आहे. त्यामध्ये १४ स्थानके असणार आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा सहा किलोमीटर मार्ग भूमिगत आहे. यामध्ये पाच स्थानके असतील. पीसीएमसी ते शिवाजीनगर हा उन्नत मार्ग आहे. त्यावर आठ स्थानके आहेत. वनाझ ते रामवाडी हा १५.७ किलोमीटरचा मार्ग आहे. तो पूर्णतः उन्नत आहे. त्यामध्ये १६ स्थानके आहेत.

पीसीएमसी ते फुगेवाडी हा सात किलोमीटर मार्ग आहे. त्याची पाहणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी जानेवारी महिन्यात केली होती. त्यांनी मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यास मान्यता दिली आहे. वनाझ ते गरवारे या पाच किलोमीटर मार्गिकेचीही पाहणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये केली आहे. ही मार्गिकाही प्रवाशांना खुली करण्यास त्यांनी मान्यता दिली आहे.

वनाझ ते गरवारे व पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गिकांना मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे १८ किलोमीटरच्या या मार्गावर १० मेट्रो स्थानके आहेत. हे मार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुले होणार आहेत. टप्प्याटप्प्याने उर्वरित २१ किलोमीटर मार्ग एक वर्षाच्या आत खुला करण्यात येणार आहे, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT