sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी: अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स व किऑक्सवर होणार धडक कारवाई

कोरोना संसर्गामुळे न्यायालयाने बांधकामे व घरांवर कारवाई करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणावर कारवाई थांबविली आहे.

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: कोरोना संसर्गामुळे न्यायालयाने बांधकामे व घरांवर कारवाई करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणावर कारवाई थांबविली आहे. मात्र, महापालिकेने अनधिकृत होर्डिग्ज फ्लेक्स व किऑक्सवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

कारवाई अधिक तीव्र व्हावी म्हणून क्षेत्रीय कार्यालयानिहाय असलेल्या अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाच्या पथकास ‘धडक कारवाई पथक’ असे नाव ठेवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात मिळेल त्या जागेत अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. रेड झोन, आरक्षित जागा व निळ्या पूर रेषेतही बांधकामे करून इमारतीतील सदनिका विकल्या जात आहेत. मोकळ्या जागा व रस्त्यांच्या कडेला पत्राशेड व टपऱ्या उभ्या राहत आहेत. त्या ठिकाणी तातडीने पाणी, वीज व ड्रेनेजची व्यवस्था केली जात आहे.

त्या पथकात प्रत्येकी १ परवाना निरिक्षक, बीट निरिक्षक, सुरक्षारक्षक व पोलिस कर्मचारी, ८ मजूर आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे २ रक्षक यांचा समावेश असणार आहे. मोठ्या बांधकामांवर व इतर अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर पुढील महिन्यात कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज ठाकरेंचा 'फर्स्ट क्लास' प्रवास! लोकलमध्ये गर्दीच्या वेळेतही मिळाली विंडो सीट, मनसेच्या ७ जणांना बसायलाही जागा

MNS- MVA Morcha: मग लोकसभेत ३१ खासदारांनी मतचोरी केली होती का? मविआ-ठाकरेंच्या मोर्चावर भाजपचा सवाल

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कामांवर 'डिजिटल' नजर! नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने विकसित केली ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली

मोठी बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २,५४० कोटींची मदत; रब्बी हंगामासाठी १,७६५ कोटींचे पॅकेज जाहीर

Latest Marathi News Live Update : मुंबईतील सत्याच्या मोर्चातून कॉंग्रेसचे बॅनर गायब

SCROLL FOR NEXT