abducted  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : टोळक्याकडून तरुणाचे अपहरण

जंगलात नेवून कोयत्याने वार, बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने मोटारीतून तरुणाचे अपहरण केले. जंगलात नेवून कोयत्याने वार करीत बेदम मारहाण जीवे मारण्याची धमकी दिली. केली. हा प्रकार थेरगाव, पुनावळे व जांबे येथील जंगलात घडला. याप्रकरणी दीपक सुभाष आल्हाट (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ काळे, दीपक तेलंगे (दोघेही रा. थेरगाव ) , बंटी लोखंडे (रा. वाल्हेकरवाडी ), सुनील सुभाष जाधव, अरविंद मुन्ना शर्मा (दोघेही, रा. थेरगाव ), हिरा शेख (रा. पुनावळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसह मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास थेरगावातील बारणे कॉर्नर येथे होते. त्यावेळी काळे, तेलंगे, लोखण्डे, जाधव व शर्मा हे आरोपी मोटारीतून तेथे आले. काळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ करून जबरदस्तीने त्यांच्या मोटारीत बसविले. त्यानंतर पुनावळे येथील काटे वस्ती रस्त्याने जांबे जवळील जंगलात नेले. तेथे आरोपी शेख याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीवर वार केले. तर इतर आरोपींनी बांबूने, पट्ट्याने , लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 'पुन्हा आमच्या नदी लागला तर ,, तुला जीवे मारू' अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा मोटारीत बसवून वाल्हेकर वाडी येथील आहेर गार्डन जवळ बसवून आरोपी पसार झाले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT