PM awas yojana pimpri chinchwad lottery declared after 1 and half month
PM awas yojana pimpri chinchwad lottery declared after 1 and half month 
पिंपरी-चिंचवड

दीड महिन्यानंतर ‘पंतप्रधान आवास’ची सोडत

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : तब्बल दीड महिन्यानंतर चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाइन पंतप्रधान आवास योजना सोडत काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोडतीच्या ठिकाणी न येण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. तरी आशा आणि उत्सुकतेपोटी अर्जदारांनी प्रेक्षागृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. गोंधळ होण्याची शक्‍यता गृहीत धरून मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात असल्याने शांतता पसरली होती. 

प्रेक्षागृहात महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, आयुक्त राजेश पाटील उपस्थित होते. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. या योजनेतील घरांसाठी ४७ हजार ८७८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४७ हजार ७०७ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे चऱ्होली एक हजार ४४२, रावेत ९३४, बोऱ्हाडेवाडी एक हजार २८८ अशा तीन हजार ६६४ घरांसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीनंतर सदनिकेची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. महापालिकेने योजनेसाठी १७ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. तीन हजार ६६४ सदनिकांसाठीची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. 


...तरी नागरिकांची गर्दी 
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी उपस्थित न राहता महापालिकेने जाहीर केलेल्या या लिंकवर जाऊन ऑनलाइन उपस्थित राहावे. तसेच लाभार्थ्यांना घर बसल्या LiveYouTube  या लिंकवर ही सोडत पाहण्याची सोय केली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोडतीच्या ठिकाणी न येण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. या योजनेची सोडत महापालिकेच्या फेसबुक पेजवर दाखविण्यात आली. तरी मोठ्या संख्येने अर्जदारांनी सकाळी साडे नऊपासून चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या आवारात गर्दी केली होती. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता. 

दृष्टिक्षेपात अर्ज 
एकूण अर्ज ः ४७,८७८ 
पात्र अर्ज ः ४७,७०७ 

सदनिका 
१४४२ - चऱ्होली 
९३४ - रावेत 
१२८८ - बोऱ्हाडेवाडी 
३६६४ - एकूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT