PMPML 
पिंपरी-चिंचवड

पीएमपीएमएल वाहक-चालक अडकले ‘चक्रव्यूहात’

संजय बेंडे

भोसरी - पीएमपीएमएलमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या वाहक व चालकांना दररोज काम मिळत नसल्याने पगार मिळविण्यासाठी शिल्लक असलेल्या रजा काम नसलेल्या दिवसांसाठी भरून देण्याची वेळ आली आहे. मात्र, रजा शिल्लक नसलेल्या काही वाहक-चालकांना  काम दिले जात नसल्याने अशा कामगारांना महिन्याचा अल्प पगार मिळत आहे. अशा अल्प पगारावर जगायचे कसे, असा प्रश्न एका वाहकाने उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सहा महिन्यांच्या दिलेल्या कालावधीत दर महिन्यात २१ दिवस कामाचे भरणे गरजेचे असते. मात्र, हे दिवस न भरल्याने काही कर्मचाऱ्यांना कायम होण्यासाठी पुन्हा पुढील सहा महिने रोजंदारीवर काम करण्याची वेळ आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थिती

  • गेल्या कित्येक वर्षापासून पीएमपीएमएलमध्ये रोजंदारीवरील वाहक-चालकांना केले कायम
  • सहा महिन्याच्या दिलेल्या कालावधीत प्रत्येक महिन्यात २१ दिवस कामाचे बंधन
  • आतापर्यंत जानेवारी २०२० ते जुलै२०२० आणि २०२० ते जानेवारी २१ असा कालावधी
  • कोरोनाचा कालावधी बसफेऱ्या महिन्याचे २१ दिवस काम मिळाले नाही
  • काम मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी पगार पूर्ण मिळविण्यासाठी शिल्लक रजा भरून देऊन त्या दिवसाचा पगार घेतला
  • काही कर्मचाऱ्यांच्या रजाच शिल्लक नसल्याने त्यांचे महिन्यातून सहा-सातच दिवस भरले
  • त्यांना पगारही मिळत नव्हता आणि कायम नोकरीसाठीचा दिलेला कालावधीही वाया गेला.

कर्मचारी म्हणतात..

  • आम्ही काम मागत असतानाही काम मिळत नव्हते
  • ज्यांच्या रजा शिल्लक नाहीत त्यांना काम देण्याच्या सूचना पीएमपीएमएल प्रशासनाद्वारे केलेल्या होत्या. मात्र, रजा शिल्लक नसलेल्यांना डावलून इतरांना देण्यात आले काम
  • पगार नाही मिळाला आणि नोकरीत कायम होण्यासाठी दिलेल्या कालावधीही वाया
  • आमची कोणतीही चूक नसल्याने पीएमपीएमएलने आम्हाला कायम करावे

सध्या काम मिळत आहे. मात्र, भोसरी आगारात बसची संख्या कमी असल्याने दररोज काम मिळेल की नाही याची शंका आहे. कायम असणाऱ्या वाहक-चालकांना पीएमपीद्वारे भोसरी आगारात काम नसल्यास इतर आगारात काम दिले जाते. आमची काम करण्याची तयारी आहे. त्यामुळे आम्हालाही पीएमपीने दररोज काम दिले पाहिजे. आमची चूक नसतानाही आमचा कन्फर्म पिरीयड वाढला आहे.
- वाहक, पीएमपीएमएल, सद्‌गुरू आगार, भोसरी

सध्या पीएमपीएमएलच्या १७०० बसपैकी १५०० बसच सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक रोजंदारीवरील कामगारांना काम देणे शक्य होत नाही. मात्र रोजंदारीवरील कामगारांना कायम करण्यासाठी पुन्हा सहा महिन्यांच्या दिलेल्या तिसऱ्या टप्प्यात या वाहक-चालकांना कामासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना दिवस भरण्यासाठी ओव्हर टाइमही दिला जाणार आहे.
- रमेश चव्हाण, आगार व्यवस्थापक, सद्‌गुरू डेपो, भोसरी

रोजंदारीवरील कामगारांचा कायम करण्यासाठीचा कालावधी जरी हुकला तरी त्यांच्या वेतन आणि वेतनवाढीवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, कायम होण्यासाठी या कर्मचाऱ्यांना दिलेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दर महिन्याला २१ दिवस कामाचे भरणे बंधनकारक आहे.
- नितीन घोगरे, प्रशासन अधिकारी, पीएमपीएमएल

पीएमपीएमएलमधील भोसरी आगाराद्वारे काम देण्यात आले नाही. त्यामुळे पगारासाठी रजा भरून दिल्या. आता सर्व रजा जानेवारी २०२१ मध्येच संपल्या आहेत. आता काम न दिले गेल्यास पगारही मिळणार नाही. सध्या आमचा सहा महिन्याचा कन्फर्म पिरीयड सुरू आहे. यामध्ये कामाचे आवश्यक दिवस न भरल्यास आमची अडचण वाढणार आहे.
- चालक, पीएमपीएमएल, सद्‌गुरू आगार, भोसरी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT