police constable dies in accident at mumbai bangalore highway Sakal
पिंपरी-चिंचवड

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस हवालदाराचा मृत्यू

दुचाकीवरून घराकडे निघालेल्या पोलिस हवालदार सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहणाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

वाकड : दुचाकीवरून घराकडे निघालेल्या पोलिस हवालदार सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहणाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथे घडली.

अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. सचिन नरुटे देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकात कार्यरत असताना त्यांनी सतत्याने उत्तम कामागिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

ते स्वभावाने अत्यंत शांत, नम्र व मनमिळावू होते त्यांच्या अकाली जाणाने पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधीपासूनच हिंदीत होतेय K DRAMAची कॉपी ! माणिक-नंदिनीची गाजलेली मालिका आहे 'या' सिरीजवर आधारित

Latest Marathi News Live Update: प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Mappls : हायवेवर सिक्रेट स्पीड कॅमेरा कुठं आहे? गुगल मॅपपेक्षा भारी आहे 'हे' भारतीय App, जाणून घ्या महत्त्वाचं फीचर

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेतून ३ कोटींच्या सोन्याची बॅग लंपास; बडनेरा रेल्वे स्थानकावर सराफा व्यावसायिकाला मोठा धक्का

Dhule Zilla Parishad : धुळे जि. प. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव! ५६ गटांची आरक्षण सोडत जाहीर, २८ जागांवर महिलांना संधी

SCROLL FOR NEXT