पिंपरी-चिंचवड

भोसरीत सकाळी 'जनता कर्फ्यू'चा फज्जा अन् सायंकाळी ही परिस्थिती...

संजय बेंडे

भोसरी : येथे जनता कर्फ्यूचा फज्जा उडाल्यानंतर पोलिसांद्वारे सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरीत फेरी काढून दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याने सायंकाळी पाचनंतर भोसरी परिसरात बंद पाळण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने रविवारी (ता. ५) जनता कर्फ्यू लागू केला होता. मात्र, नागरिक व दुकानदार यांच्यामध्ये याविषयी जनजागृती झाली नसल्याने सकाळपासूनच सर्वच दुकाने सुरू राहिल्याने कर्फ्यूचा फज्जा उडाला. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरी पोलिसानी फेरी काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे दुकाने सुरू राहिल्यास कारवाई करण्याचीही तंबी देण्यात आली. त्यामुळे भोसरी परिसरातील दिघी रस्ता, पीएमटी चौक, आळंदी रस्ता, चांदणी चौक ते लांडेवाडी चौकापर्यंतचा रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर बसणारे विविध वस्तू विक्रेते यांनी दुकाने बंद केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दुकाने सुरू राहिल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर दुकानदारांनी दुकानाबाहेरील वस्तू दुकानामध्ये घेण्यास लगबग सुरू केली. त्याचप्रमाणे रस्त्यावर बसणाऱ्या भाजी-फळे विक्रेत्यांचीही भाजी उचलण्यासाठी धावपळ सुरू होती. तर काही भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री जलद व्हावी, यासाठी भाजी स्वस्त दरात विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वस्तातील भाजी घेण्यासाठीही काही वेळ नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, जनता कर्फ्यू असल्यामुळे भोसरी पोलिसांनी सकाळीच फेरी मारून दुकानदारांना दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या असत्या, तर आजचा जनता कर्फ्यू यशस्वी झाला असता, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहनांची गर्दी...

महापालिकेने जनता कर्फ्यू लागू केल्यानंतर नागरकांनी घरी राहणे अपेक्षित होते. मात्र, भोसरी परिसरात नागरिक घराबाहेर आल्याने वाहनांची गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे खरेदीसाठी आळंदी रस्ता, पीएमटी चौक, दिघी रस्ता आदी भागात आलेल्या ग्राहकांमुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या दिसून आल्या. जनता कर्फ्यू जाहीर झाल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या वाहनांवर पोलिसांद्वारे निर्बंध लावण्यात येणे गरजेचे असताना, अशा वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: 24 विभागांत विभागलेली मुंबई; एकूण वॉर्ड किती? कारभार सोपा की गुंतागुंतीचा? पाहा मुंबई महापालिका निवडणुकीचं संपूर्ण गणित

पाकड्याची लाज गेली! BBL पदार्पणात Shaheen Afridi ला गोलंदाजी करण्यापासून रोखले; अम्पायरने कान टोचले, नेमके काय घडले? Video

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर ,भुसावळ, रावेर यावल तालुक्यातील बाजारात मक्याची आवक वाढली

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

SCROLL FOR NEXT