Lockup Sakal
पिंपरी-चिंचवड

‘लॉकअप’ची पिंपरी शहरात कमतरता

पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे मिळून स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आले, तसेच काही ठाण्यांचे विभाजन केल्याने ठाण्यांची संख्या वाढली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पुणे शहर (Pune City) व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे (Police Station) मिळून स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आले, तसेच काही ठाण्यांचे विभाजन केल्याने ठाण्यांची संख्या वाढली. मात्र, अद्यापही बहुतांश पोलिस ठाण्यात ‘लॉकअप’ (Lockup) नसल्याने आरोपी (Accused) ठेवताना पोलिसांची धावपळ होत आहे.

आयुक्तालयात सध्या पिंपरी, चिंचवड, सांगवी, भोसरी, निगडी, वाकड, हिंजवडी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी, चाकण, चिखली, दिघी, भोसरी एमआयडीसी असे पंधरा पोलिस ठाणे असून आणखी काही नवीन ठाण्यांची निर्मिती होत आहे. मात्र, सध्या केवळ देहूरोड, पिंपरी, दिघी, भोसरी, चाकण येथेच आरोपींना ठेवण्यासाठी ‘लॉकअप’ आहेत. त्यामुळे इतर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींसह इतर शाखेने पकडलेल्या आरोपींनाही येथीलच ‘लॉकअप’ला ठेवावे लागते.

आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करणे, कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा ‘लॉक अप’ ला आणण्यासाठी दूर अंतरावरून आरोपींची ने-आण करावी लागते. यामध्ये जोखीम असते. दरम्यान, थोडा जरी निष्काळजीपण झाल्यास आरोपी पसार होण्याचीही भीती असते. यामुळे संबंधित ठाण्यात ‘लॉक अप’ असल्यास सोयीचे ठरते. मात्र, ठाण्यात स्वतंत्र ‘लॉक अप’ नसल्याने पोलिसांना कसरत करावी लागते. तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे या भागातील आरोपी देहूरोड येथे, चिखली, निगडी, चिंचवड, वाकड, सांगवी आदी परिसरातील आरोपी पिंपरी ठाण्यासह इतर ठाण्यात तर भोसरी एमआयडीसी, सांगवी येथील आरोपी भोसरी ठाण्यासह इतर ठाण्यात ठेवले जातात. तर आळंदी व इतर ठिकाणचे आरोपी दिघी ठाण्यात ठेवले जातात.

गुन्ह्यांची संख्या वाढतेय

नव्याने आयुक्तालय अस्तित्वात आले. आयुक्तालयाच्या हद्दीतील लोकसंख्या अधिक असल्याने ठाण्यासह चौकीचीही संख्या वाढली. दरम्यान, गुन्हेही वाढल्याने आरोपींची संख्याही वाढते. त्यामुळे अनेकदा पूर्वीची लॉकअप अपुरी पडतात. यामुळे पोलिसांना धावपळ करावी लागते. दरम्यान, वाकडसह इतर काही ठाण्यांत लॉकअप बांधून तयार आहेत, मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार, कधी पूर्ण होणार?

IPL 2026: RCB फॅन्सचा आनंद गगनात मावेना! CSK ला हरवल्यानंतर Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Kash Patel : इराणच्या हॅकर ग्रुपने हॅक केलं FBI डायरेक्टर काश पटेल यांचं अकाऊंट; डोनाल्ड ट्रम्पही चक्रावले, नेमकं प्रकरण जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : भूम तालुक्यात शेतकऱ्यांचं संतापजनक आंदोलन; महामार्गावर रास्ता रोको!

IPL 2026: RCB कडून पराभूत झाल्यानंतरही CSK च्या फलंदाजांनी केला वर्ल्ड रेकॉर्ड; टी२० मध्ये असा पराक्रम करणार पहिलाच संघ

SCROLL FOR NEXT