Crime
Crime 
पिंपरी-चिंचवड

जामिनासाठी मदत करणारे पोलिस लाच घेताना जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

कामशेत - न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कामशेत पोलिस ठाण्याचे निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला एक लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी (ता. ६) कामशेत येथे करण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना गोवित्री संस्थेतील बनावट मतदार यादीत फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना वडगाव न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. मात्र, त्यांना जामिनाबाबत मदत करण्यासाठी पोलिसांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी अडीच लाख रुपये दिले होते. त्यानंतर नेवाळे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांनी उर्वरित अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रेय शेवाळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने शनिवारी या तिघांना एक लाख रुपये स्वीकारताना अटक केली. आरोपींवर कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेंद्र बनसोडे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अलका सरग, सुनील क्षीरसागर, कर्मचारी वैभव गिरीगोसावी, किरण चिमटे यांनी सापळा रचून कारवाई केली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT