पिंपरी-चिंचवड

चिंचवडमधील रस्त्यांवरून शिवसेना अन् भाजपमध्ये राजकारण पेटलंय

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्‍नावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्याची प्रचिती महापालिका स्थायी समिती सभेतही आली. गेल्या दोन सभांमध्ये वाकड-ताथवडेतील रस्त्यांचे विषय गाजले. चारपैकी दोन रस्त्यांचे प्रस्ताव भाजपने फेटाळले. त्यावर राष्ट्रवादी व शिवसेनेने आताच्या सभेत कुरघोडी केली. भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गावातील रस्त्याच्या विषयावर मतदान घ्यायला लावून प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आणि 'विकासा'ची 'चाल' चालल्याचे सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार जगताप आणि ताथवडे- वाकड प्रभागाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोघेही एकमेकांच्या विरोधात लढले. कलाटे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले होते. त्यांच्या प्रभागातील चार नवीन रस्त्यांचा प्रस्ताव गेल्या महिन्यातील स्थायी समिती सभेत होता. त्यातील दोन प्रस्ताव मतदानाद्वारे मंजूर झाले होते. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे समर्थक सदस्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीची बाजू घेतली होती. तर, जगताप समर्थकांनी विरोधात मतदान केले होते. त्या वेळी तहकूब केलेले दोन प्रस्ताव नंतरच्या सभेत जगताप व लांडगे समर्थकांनी एकमताने फेटाळून लावले. आता जगताप यांच्या पिंपळे गुरवमधील रस्ता सिमेंटचा करण्याचा प्रस्ताव होता. त्यावर राष्ट्रवादी व शिवसेनेने मतदान घ्यायला लावले. पण, प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून विषय मंजूर केला. 

स्थायी समिती कोरम 

  • एकूण सदस्य : 16 
  • उपस्थित : 10 
  • भाजप : 6 
  • राष्ट्रवादी : 3 
  • शिवसेना : 1 


आम्ही भाजपच्या बाजूने नव्हे, तर विकासाच्या बाजूने मतदान केले आहे. 
- राहुल कलाटे, गटनेता, शिवसेना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT