पिंपरी-चिंचवड

महिलेसोबतचे 'त्या' अवस्थेतील फोटो त्याने व्हायरल केले अन्...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महिलेचे अश्‍लील व्हिडिओ व फोटो व्हायरल केले. या बाबत विचारणा केली असता महिलेसह तिच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला. 

अरविंद उपाध्याय (रा. ग्यानपूर, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांच्या पतीमध्ये होत असलेल्या वादाचा गैरफायदा घेऊन आरोपीने सहानुभूती दाखविण्याचा बहाणा करीत फिर्यादीशी जवळीक साधली. त्यानंतर त्यांच्यात होत असलेल्या शारीरिक संबंधाचे रेकॉर्डिंग करीत अश्‍लील फोटो काढले. हे व्हिडिओ व फोटो व्हायरल केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत फिर्यादीने फोनवरून आरोपीला विचारणा केली असता 'यापुढे माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास तुला व तुझ्या मुलीला खल्लास करून टाकीन' अशी धमकी आरोपीने दिली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT