पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात महावितरण अजूनही धक्क्यातच; कारण तिसऱ्या दिवशीही...

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : लोणावळा उपविभागात निसर्ग वादळामुळे महावितरणला जबरदस्त 'शॉक' बसल्याचे चित्र आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामूळे लोणावळा उपविभागात विजेचे ६१ उच्च दाब, ७९ लघू दाब असे १४० पोल जमिनदोस्त झाले आहे. तर १२ उच्च दाब ३३ लघु दाब पोल वाकलेल्या स्थितीत आहे. त्याचबरोबर झाडे आणि झाडांच्या फांद्या पडून अनेक ठिकाणी वीजवाहीनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा तिसऱ्या दिवशीही विस्कळीत झालेला आहे. 

निसर्ग चक्रीवादळाचा धोका असल्याने महावितरणच्या वतीने लोणावळा उपविभागीय परिसराचा विद्युत पुरवठा खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे जीवितहानी टळली. वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर महावितरण कंपनीच्या वतीने युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आले असून, पडलेले पोल, तुटलेल्या तारांची पाहणी केल्यानंतर टप्प्याटप्प्यानी वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता यू. एस. चव्हाण यांनी दिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रात्रभर वारा व पाऊस असल्याने कुठेही वीज चालू करता आली नाही. सकाळपासून लाईन पेट्रोलींग सुरू करण्यात आले आहे. जनमित्राकडून अहवाल घेऊन टप्प्याटप्प्याने वीज सुरळीत करण्यात येईल. लोणावळ्यास वीजपुरवठा करणारे १०० केव्ही सबस्टेशनला येणारी टॉवर लाइन चालू झाली झाली असून, पुढील वीजपुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासणी करूनच चालु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे चव्हाण म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT