पिंपरी-चिंचवड

बापरे! मावळातील हे गाव महिन्यापासून अंधारात

सकाळ वृत्तसेवा

कामशेत (ता. मावळ) : निसर्ग चक्रीवादळात कोलमडून पडलेली वीज यंत्रणा अद्याप सावरलेली नाही. मावळात अद्याप अनेक गावे अंधारात आहेत. नायगावजवळील येवलेवाडी येथे सात घरे ३५ दिवसांपेक्षा जास्त दिवस अंधारात आहेत, याकडे कोणाचेही लक्ष नाही. या बाबत वेळोवेळी महावितरण कार्यालयात तक्रार देऊनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराच्या जवळील पवनानगर रस्त्याच्या कडेला वसलेल्या येवलेवाडी येथे गेल्या ३५ दिवसांपेक्षा जास्त दिवस वीजपुरवठा खंडित आहे. याविषयी महावितरण कार्यालयात विठ्ठल येवले, अमोल येवले, संदीप येवले, प्रशांत गाढी, अतुल सपकाळ आदीं ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे. तसेच वीजपुरवठा सुरू करावा, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची मागणी होत आहे.

सहाय्यक अभियंता विनोद राणे म्हणाले, "मावळ तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्याप वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. तो सुरळीत करण्यासाठी महावितरण अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. येवलेवाडी येथे पडलेला विजेचा खांब संबंधित व्यक्ती तेथे बसवू देत नसल्याने आम्ही येथील डीपी बंद केली आहे.

कान्हेचे सरपंच विजय सातकर म्हणाले, "स्थानिकांनी समंजसपणे यातून मार्ग काढावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना सहकार्य करण्याची ही वेळ आहे. सध्या महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा. भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, यासाठी ग्रामपंचायत, महावितरण व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून मार्ग काढू."

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT