BJP Sakal
पिंपरी-चिंचवड

प्राधिकरण विलिनीकरणास भाजपचा विरोध; निर्णयाचा निषेध

नवनगर विकास प्राधिकरणाचे राज्य सरकारने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाचे (Pradhikaran) राज्य सरकारने (State Government) पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) (PMRDA) विलिनीकरणाचा (Merger) निर्णय घेतला आहे. त्याचा महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी (BJP Corporator) निषेध केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना (Shivsena) नगरसेवकांनी समर्थन केले. (Pradhikaran Merger Oppose by BJP Protest Politics)

प्राधिकरण विलिनीकरणाचा निर्णय राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहरावर लादला आहे. यातून महापालिकेला मिळणारा पन्नास हजार कोटींचा निधी लाटण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली. महापालिकेत विलिनीकरणाची मागणीही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर व शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी निर्णयाचे समर्थन केले. नागरिकांना फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या विषयावरील चर्चेत अभिषेक बारणे, अर्चना बारणे, राहुल जाधव, विकास डोळस, आशा शेंडगे, संदीप कस्पटे, सीमा सावळे, झामाबाई बारणे, अजित गव्हाणे, मीलन यादव यांनीही सहभाग घेतला.

अन्य मंजूर विषय

- कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी हिंदुस्थान अॅंटिबायोटिक कंपनीस (एचए) २५ कोटी रुपये मदत करणे, पीएमपीच्या हिंजवडी ई-बस चार्जिंग स्टेशनसाठी ९८ लाख रुपये देणे, भोसरी नवीन रुग्णालयासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ८० लाख रुपये, प्रभाग अठरामधील स्मशानभूमीत विद्युत विषयक काम करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT