may.jpg 
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत पर्यावरणप्रेमी करताहेत बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचे सावट असतानाही गणेशोत्सव साजरा करण्याचे अनेकांनी ठरविले आहे. या उत्साहाने चिंचवडगावातील गृहिणी वसुधा जगदाळे यांनी "मयुरासन' तर भोसरीतील कुणाल लांडगे यांनी "शिवतांडव' थीम निवडली आहे. त्यासाठी त्यांनी पर्यावरणस्नेही मखरांना प्राधान्य दिले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी असल्याने यंदाही बाजारात कापडी, लाकडी, कागदी वैविध्यपूर्ण मखरे बाजारात दाखल झाली आहेत. ही मखरे वजनाला हलकी आणि दिसायलाही आकर्षक असल्याने लक्ष वेधून घेत आहेत. 

कोरोनाचा संसर्ग पाहता अनेकजण घरात गणपती बाप्पाची स्थापना करणार आहेत. थर्माकोलच्या तुलनेत या मखरांच्या किमती कमी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. फोमशीट, कागद, कापड आणि लाकडापासून तयार केलेल्या मखरांचे वैविध्यपूर्ण प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकर्षक फुले, जाळीचे कापड, टिकल्यांचे कापड, रंगीत फोमशीट, नाजूक काठ्या यांचा सुरेख वापर ही या मखरांची वैशिष्ट्ये आहेत.

रंगीबेरंगी कापडावर विविध प्रकारच्या टिकल्या लावून मखरांना सजवले जाते. जाळीच्या नाजूक कापडाच्या कलात्मक वापरामुळे मखर अधिक आकर्षक दिसते. मखराच्या आतमध्ये गवताच्या गाद्या असतात. या मखरांची किंमत साधारण 800 रुपयांपासून आहे. कापडी मखराची घडी घालून ठेवता येत असल्याने कापडी मखरेही घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. या मखरांची किंमत दीड हजार रुपयांपासून आहे. लाकडी आणि फोमशीटपासून तयार केलेल्या मखरांतही विविध कलात्मक डिझाईन 400 रुपयांपासून उपलब्ध आहे. अगदी तीन इंच ते 3 फुटांपर्यंतच्या गणपतीसाठी ही चौरंग, मूषकवाहक रथ, सिंहासन, पतंग, त्रिशूळ, केळी, कमळाच्या आकारातील खास मखरे तयार केळी असून 65 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत ही मखरे उपलब्ध आहेत. 

यंदा लाखो रुपयांचे नुकसान 
सार्वजनिक मंडळासाठी तीन फूट आकाराची मंदिराच्या आकाराची खास मखर तयार करण्यात येतात. परंतु यावर्षी मंडळांकडून मंदिरांना मागणीच नाही. गेल्यावर्षी 1 हजार मखरांची विक्री झाली होती. यावर्षी फक्त 200 मखरांची विक्री झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 60 टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT