पिंपरी-चिंचवड

...यामुळे 'पीएमपी'ने हिंजवडी आयटी पार्क व औद्योगिक कंपन्यांना साकडे घातले

सुवर्णा नवले

पिंपरी : कोरोनामुळे गाळात रुतलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरिता पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) हिंजवडी आयटी तसेच तळेगाव, भोसरी व चाकणच्या औद्योगिक कंपन्यांना साकडे घातले आहे. परिणामी, हिंजवडी आयटी असोसिएशन व औद्योगिक कंपन्याने सकारात्मक विचार करून पीएमपीसोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. या उपक्रमास प्रतिसाद मिळाल्यास शंभर कोटीचे उत्पन्न पीएमपीला मिळू शकेल असा अंदाज पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

केंद्र व राज्य सरकारने विविध अटी शर्तीवर उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांसाठी वाहन व्यवस्था अपुरी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्य स्थितीत पीएमपी बसेस अत्यावश्‍यक सेवेसाठी वापरण्यात येत आहेत. त्या वगळता सर्व बस विना वापर पडून आहेत. कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड व आसपासच्या परिसरात विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंपन्यांना ही बस सेवा मासिक तत्त्वावर 83.51 प्रती किमी व किमान 2 हजार किलोमीटर प्रतिमहा दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, या बसेस देखील लॉकडाउनच्या नियमांप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सॅनिटाइज करून सेवा देण्यात येणार आहे. प्रवासी क्षमता चालक व वाहक यांच्या समवेत केवळ 21 ठेवली जाणार आहे. सर्वांना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पीएमपीला काय फायदा..?

भोसरीच्या नारी संस्थेने कात्रज ते भोसरीपर्यत दोन बस सुरू केल्या आहेत. औद्योगिक कंपन्या व आयटी क्षेत्रासाठी बस सेवा सुरळीत सुरू झाल्यास पीएमपीला एका बस पाठीमागे महिन्याला पावणे दोन लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तर पाचशे बस पाठीमागे शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. मात्र, हिंजवडी आयटी असोसिएशनने बसच्या दराबाबत आणखी सवलत मागितली आहे. ही सेवा सुरू झाल्यास पीएमपी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होऊन पीएमपी रुळावर येण्यास मदत होणार असल्याचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.


आकडे बोलतात

  • सीएनजी/ मिडी व इतर बस - 400 ते 500
  • चालक वाहक - 3 ते 4 हजार
  • सध्या पुणे व पिंपरीत अत्यावश्‍यक सेवेत असणाऱ्या बस- 200
  • एकूण बस - 2600 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT