Preserve the civilized culture in politics advise City dwellers to Deputy Mayor PCMC 
पिंपरी-चिंचवड

राजकारणातील सभ्य संस्कृती जपा;शहरवासीयांचा उपमहापौर यांना सल्ला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानमधून रसद पुरवली जाते. दिल्लीतील आंदोलनासाठी तीनशे रुपये भाड्याने माणसे आणली जातात, असे वादग्रस्त विधान मंगळवारी उपमहापौर केशव घोळवे यांनी महापालिका सभेत केले. याविरोधात काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "तुम्ही सभ्य संस्कृतीचा अपमान केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची माफी मागा'', असा सूर त्यातून व्यक्त झाला आहे.

अभ्यास करून बोलायला शिका
"तुम्ही मानाच्या पदावर आहात. तुमचे बोलणे सर्वसमावेशक असले पाहिजे. हे शहर शेतकरी, कामगार यांच्या मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतीक आहे. तुमच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान झाला आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांना तुमचा पाठिंबा का नाही.''
- कॅप्टन रघुनाथ सावंत, निवृत्त सैनिक घरकुल चिखली)

पदाची प्रतिष्ठा गमावली
"शहरातील बहुसंख्य कामगार शेतकरी पुत्र आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलन चीन व पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा शोध तुम्ही कसा लावला? तुमची तारांकित राजकीय विचारसरणी अतिशय असभ्य आहे. तुम्ही उपमहापौर पदाची प्रतिष्ठा गमावली आहे.''
- बाजीराव गुजर, निवृत्त कामगार बजाज ऑटो प्राधिकरण

वाचाळ संस्कृतीचे प्रदर्शन
"तुम्ही शेतकरी आंदोलनाचा अपमान करून वाचाळ संस्कृतीचे प्रदर्शन केले आहे. आपण जाहीर माफी मागून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे. तुम्ही सभ्य संस्कृतीचा अपमान केला आहे. स्वतः ऊसतोड कामगारांचे पुत्र आहात. शहराचे सन्माननीय नागरिक आहात. रामकृष्णाच्या संस्कृतीचा अहोरात्र जप करणाऱ्या त्यांच्या राजकीय विचारसरणीचा स्वतःच्या वक्तव्याने पराभव केला आहे.''
- क्रांतिकुमार कडूलकर, कार्यालयीन सचिव, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष

वक्तव्य निषेधार्ह
"शेतकरी आंदोलन नव्या कृषी कायद्याविरोधात आहे. लाखो आंदोलक शेतकऱ्यांचा अपमान करणारे तुमचे वक्तव्य निषेधार्ह आहे. शहराच्या कामगार चळवळीच्या इतिहासात शेतकऱ्यांबद्दल अशा प्रकारचे अपमानजनक विधान प्रथमच केल्याने समस्त कामगार आणि पिंपरी-चिंचवडकरांना तुमच्या वक्तव्य लज्जास्पद आहे.''
- सुशीलकुमार नहार, कामगार नेते टाटा मोटर्स 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT