Printing Press sakal
पिंपरी-चिंचवड

Printing Press Business : समाजमाध्यमांमुळे पत्रिका व्यवसाय डबघाईला

गेल्या दोन वर्षांपासून ७५ टक्के पत्रिका व्यवसाय कमी

सकाळ वृत्तसेवा

रहाटणी - कोरोना काळात लग्न मोजक्याच लोकांमध्ये होत असे. निमंत्रण पत्रिकाही व्हॉट्सअपसारख्या समाज माध्यमाच्या मार्फत मोबाईलवर पाठवली जाई. मात्र, हीच पद्धत अंगवळणी पडल्याने गेल्या दोन वर्षापासून पत्रिका व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे.

कोरोना महामारीकाळात निर्बंध असल्याने पाहुण्यांकडे प्रत्यक्ष जाऊन पत्रिका देणे शक्य नव्हते. त्यात मोजकेच लोक असत. त्यामुळे कागदी पत्रिका छापण्याचा प्रश्नच येत नसल्याने पत्रिका छपाई बंद होती. महामारीनंतर हा व्यवसाय पूर्ववत होईल, असे वाटत होते.

मात्र, लोकांनी प्रत्यक्ष जाऊन पत्रिका देण्याच्या परंपरेला फाटा देत व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवणे पसंत केले आहे. त्यामुळे पत्रिका व्यवसाय सुमारे ७५ टक्के कमी झाला आहे. परिणामी या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांचा रोजगार गेला आहे.

घटस्थापनेपासून सुरू झालेला हा व्यवसाय जून, जुलैपर्यंत जोरात चालायचा. छपाईचा ताण असल्याने अनेक छपाईवाले पत्रिकेवर टिकली, मुत्ती चिकटवणे, पाकीट चिकटवणे अशी कामे महिलांना घरी देत असत. त्या मधून महिलांना महिन्याला १० ते १५ हजार रोजगार मिळत असे. मात्र, व्यवसाय कमी झाल्याने छपाईखान्यातील कामगारच ही कामे करतात. तसेच मोठ्या प्रमाणात कामगार कपातही करण्यात आली आहे.

पत्रिका फक्त मान्यवरांनाच

विवाह, जागरण गोंधळ, वास्तुशांती आदी मंगलकार्यांत साधारणपणे पाचशे ते तीन-चार हजार निमंत्रण पत्रिका छापल्या जात असत. मात्र, ही संख्या केवळ पन्नास ते शंभरवर आली आहे. महत्त्वाच्या लोकांसाठी आणि देवाजवळ ठेवण्यासाठीच पत्रिका छापल्या जात आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय पुढारी अगोदर १० ते १५ हजार पत्रिकांची छपाई करत असत. ते आता पाच हजारांवर आलेत.

पत्रिकांची मागणी कमी झाल्याने दिल्ली, अहमदाबाद येथील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. ३५ वर्षांपासून या व्यवसायात असून, पहिल्यांदाच असा अनुभव आला आहे. सध्या चलन, बिल पुस्तक, पत्रके छपाई पूर्वी प्रमाणेच सुरू आहे.

- योगेश शिंदे, छपाई, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT