पिंपरी-चिंचवड

चिंचवड : श्री मंगलमूर्तींची द्वारयात्रा यंदा कशी साजरी झाली पाहा 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने श्री मंगलमूर्तीच्या द्वारयात्रेला आजपासून (ता. 21) प्रारंभ झाला. दरवर्षी वाजत-गाजत निघणारी द्वारयात्रा यंदा, मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने काढण्यात आली. 

सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदा ते चतुर्थी असे चार दिवस महासाधू मोरया गोसावी यांची द्वारयात्रा काढली जाते. या चार दिवसात मोरया गोसावी देवस्थानाच्या चार द्वाराला असणाऱ्या देवींच्या स्थानाला तसेच, श्री भैरोबाच्या स्थानाला द्वारयात्रा काढली जाते. द्वारयात्रेच्या काळात रोज सकाळी नऊ वाजता यात्रेसाठी श्री मंगलमूर्ती वाड्यातून देवस्थानचे विश्‍वस्त देव महाराज यांच्या समवेत वाजत-गाजत सुमारे 100 ते 150 भाविकांचा समुदाय निघतो.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्री मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेस प्रारंभ केला जातो. द्वाराच्या ठिकाणी पोहोचल्यावर द्वारदेवतेचे पूजन, गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी केले जातात. परत येताना मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात यात्रेचा समारोप होतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने द्वारयात्रा काढली. मंदार महाराज देव यांनी पूजा केली. शुक्रवारी (ता. 24) द्वार यात्रेचा समारोप होईल . 

...अशी असायची यात्रा 

श्रावण महिन्यात पहिल्या चार दिवसात मोरया गोसावी देवस्थानाच्या चार द्वाराला असणाऱ्या देवींच्या स्थानाला तसेच श्री भैरोबाच्या स्थानाला द्वारयात्रा काढली जाते. चिंचवडच्या जवळपास चार दिशांना पिंपरी, वाकड, रावेतचा रामाडीचा डोंगर आणि आकुर्डी या ठिकाणी मांजराई, आसराई, ओझराई आणि मुक्‍ताई या चार द्वार देवतांची यात्रा असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक दिवशी रोज सकाळी 9 वाजता द्वारयात्रेचे मंगलमूर्ती वाड्यातून प्रस्थान झाल्यावर घाटावर दर्शन, द्वारदेवतेची पूजा, गोंधळ, जोगवा, परत येताना घाटावर पदांची समाप्ती. त्यानंतर मंगलमूर्ती वाड्यात सर्वांना प्रसाद असा द्वारयात्रेचा कार्यक्रम महाराज आणि इतर भक्‍त तेथे जाऊन जोगवा-गोंधळ इत्यादी पदे म्हणायची. पूजा करायची. परत आल्यावर उरलेली धूपारतीची पदे घाटावर करत, घाटावरची आरती झाल्यावर सर्व भक्‍तांना महाप्रसाद असतो. पण यंदा कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water : खडकवासला धरणसाखळीत ३३ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा चार टक्क्यांनी पाणीसाठा अधिक

मोठी बातमी! कर्जमाफीसाठी बॅंकांना विचारली शेतकऱ्यांची जात; 'सहकार'ने सरकारला दिली ५४ रकान्यातील माहिती; मेअखेर मंत्रिमंडळात निर्णय अन्‌ ‘या’ तारखेपूर्वी लाभ

Maharashtra Day celebration : शिवनेरीवरील सुवर्णक्षणांना उजाळा; सह्याद्रीच्या पुढाकाराने जुन्नरमध्ये दरवर्षी महाराष्ट्र दिन सांस्कृतिक महा उत्सव

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

SCROLL FOR NEXT