दिघी - येथील छत्रपती संभाजी राजे चौकात राष्ट्रवादी कॅांग्रेस आणि सेवादलाद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 
पिंपरी-चिंचवड

दिघीत राष्ट्रवादी कॅांग्रेसद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

संजय बेंडे

भोसरी - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याबद्दल निंदनिय वक्तव्य केल्याबद्दल दिघी, बोपखेल राष्ट्रवादी कॅांग्रेस व सेवादलादलाद्वारे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचा दिघीतील छत्रपती संभाजी महाराज राजे निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे पडळकर यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात येण्याचै आव्हान देण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या निषेधाचे आयोजन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दिघी विभाग, सेवादल बोपखेल, माजी आमदार विलास लांडे पाटील युवा मंच आदींच्या वतीने करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, मंचचे दिघी अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट,  वसंत इंगळे, रवींद्र चव्हाण आदींनी निषेध केला. या वेळी  हसन शेख, हरिभाऊ लबडे, विलास भोसले, अभिमन्यू दोरकर, महेश झपके, संभाजी लगड, केशव वाघमारे, रवींद्र शेखरें आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी माजी नगरसेवक वाळके म्हणाले, 'आदरणीय शरद पवारसाहेबांनी राज्यासह देशातील बहुजनांच्या विकासासाठी बहुमोल कामगिरी केली आहे. याचा अभ्यास पडळकरांनी करावा. अज्ञानापोटी पवार साहेबांविषयी कोणतेही बालिश वक्तव्य त्यांनी करू नेये"

मंचचे अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट म्हणाले, "पडळकर यांनी पवारसाहेबांविषयी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. पडळकर यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात यावे. त्यावेळी या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी कॅांग्रेसद्वारे त्यांना धडा शिकविला जाईल."

या वेळी पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. निषेधासाठी पडळकर यांच्या प्रतिमेवर फुली मारण्यात आली.  

निषेध कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास भोसले यांनी केले. सूत्रसंचालन पुंडलिक सैंदाणे यांनी केले. आभार वसंत रेंगडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT