पिंपरी-चिंचवड

वायसीएम रुग्णालयातील राजकीय हस्तक्षेपाचा वैद्यकीय क्षेत्रातून असा निषेध

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या रुग्णालयात एका नगरसेवकाने घातलेल्या गोंधळाचे पडसाद मंगळवारी वैद्यकीय क्षेत्रात उमटले. अनेक डॉक्‍टर व त्यांच्या संघटनांनी या प्रकाराचा व संबंधित नगरसेवकाचा निषेध केला आहे. तसेच, यानिमित्ताने सोशल मीडियावर आपापल्या अकांउटवर वस्तुस्थितीही मांडली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
वायसीएम हॉस्पिटल हे कोविड समर्पित आहे. गेल्या चार महिन्यांपासून याठिकाणी सर्व डॉक्‍टर प्रामाणिक रुग्णसेवा देत आहेत. मात्र, सतत राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयीन कामकाजात हस्तक्षेप केला जात आहे. याचाच कहर म्हणजे एका नगरसेवकाने आणि काही कार्यकर्त्यांनी कोरोना कक्षात रुग्णांमध्ये मिसळत गोंधळ घातला. तसेच डॉक्‍टरांना शिवीगाळ करत अंगावर धावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या अशा राजकीय कार्यकर्त्यांकडून अमूक एका रुग्णास भरती करा, ऑक्सिजन बेड द्या, आयसीयू बेड द्या, व्हेंटिलेटर लावा, असे उपचाराबाबतचे निर्णय डॉक्‍टरांवर थोपवले जात आहेत. यामुळे उपचारात मोठ्या प्रमाणावर अडचणी व विसंगती निर्माण होत आहेत. अशाच राजकीय हस्तक्षेपामुळे अनावश्‍यक रुग्णांची भरती होऊन गरजूंना बेड मिळत नाहीत. त्यामुळे उपचारास विलंब लागत आहे. अशा राजकीय आशीर्वादाने भरती झालेल्या रुग्णांच्या अवास्तव मागण्या पूर्ण करण्यात रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा वेळ व ऊर्जा व्यर्थ जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे व रुग्णालय प्रशासनाकडे मागणी व पाठपुरावा करूनही डॉक्‍टर व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन, अपुरे डॉक्‍टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदी मनुष्यबळ, रुग्णसेवा देताना बाधित झालेल्या डॉक्‍टर व रुग्णालयीन कर्मचारी यांच्यावर उपचार, रुग्णसेवेसाठी आवश्‍यक वैद्यकीय साधनसामुग्रीची कमतरता, निवासी डॉक्‍टरांच्या राहण्याची व्यवस्था व जेवणाची सोय आदी मागण्यांवर केवळ आश्‍वासने दिली गेली आहेत. त्यामुळे सर्व डॉक्‍टरांमध्ये निराशेचे व भीतीचे वातावरण आहे, अशी व्यथा डॉक्‍टरांनी मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT