भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad : शक्ती प्रदर्शन करत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आदींची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज सोमवारी (ता. ६) उमेदवारी अर्ज दाखल केला.

तत्पूर्वी जगताप यांनी पिंपळेगुरव ते थेरगाव येथील “ग” क्षेत्रीय कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. या पदयात्रेत भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

“ग” क्षेत्रीय कार्यालयात जगताप यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे सादर केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते.

रॅलीमध्ये भाजपसह मित्र पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयापासून पदयात्रेला सुरूवात झाली. गावातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर

सृष्टी चौक, सुदर्शननगर, जवळकरनगर, कल्पतरू फेज १, सुदर्शन चौक, स्वराज गार्डनमार्गे पिंपळेसौदागर गावठाण पुढे शंकर मंदिर, रहाटणी चौक, विमल गार्डन, बळीराज गार्डन, कुणाल गार्डन, बापुजी बुवा मंदिर, थेरगाव हॉस्पिटलमार्गे “ग” क्षेत्रीय कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT