Crime News Esakal
पिंपरी-चिंचवड

Pune Crime News : मोशीत दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले तर भोसरीत तिघांवर कोयत्याने वार

CD

निगडीत तडीपार आरोपीला अटक
निगडी : शस्त्र बाळगणाऱ्या तडीपार आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ पोलिसांना एक लोखंडी सत्तूर मिळून आला आहे. शुक्रवारी (ता. २७) ही निगडी येथे ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मण उत्तरेश्वर उबाळे (वय २२, रा. ओटास्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे.

मोशीत दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले
मोशी : गाडीस धक्का का दिल्याच्या कारणावरून टोळक्याने दुचाकीस्वाराला मारहाण करत धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर मोबाईल आणि दीड हजाराची रोकड हिसकावून नेली. मोशी येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली.
अनिकेत अनिल नवगिरे (वय २०), भावेश वासुदेव संगणे (वय २०), रोहन प्रदीप साह (वय २०), तेजस नीलेश गायकवाड (वय १९, चौघे रा. जाधववाडी, चिखली), मेघराज नाना ताकतोडे (वय १९, रा. पंतनगर कॉलनी, चिखली), हनुमान महादू चव्हाण (वय २०, रा. कुदळवाडी, चिखली), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अरुण दगडू वाघमारे (५५, रा. वाकड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भोसरीत तिघांवर कोयत्याने वार
भोसरी : भेटण्यासाठी बोलावून तिघांवर कोयत्याने वार केले. लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी येथे ही घटना घडली. प्रकाश सुभाष शर्मा (वय २३, रा. संतनगर, प्राधिकरण, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभाष शिवमंगल शर्मा (वय ७२, रा. भोसरी), विश्वास शिंदे (वय २०), दिनेश गायकवाड (वय २२) या संशयितांसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

चहाची टपरी टाकल्याने निगडीत दोघांना मारहाण
निगडी : चहाची टपरी टाकल्याच्या कारणावरून टपरीचालकासह त्याच्या मित्राला चौघांनी मारहाण केली. ही घटना निगडीतील दुर्गानगर येथे घडली. अमित संतोष नाईक (वय २३, रा. निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अक्षय विठ्ठल पाटील (२६, रा. त्रिवेणीनगर), अक्षय खुडे, गणेश, गोपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT