pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत दोन कुटुंबात हाणामारी

पिंपरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरीतील (pimpri) नेहरूनगर येथे दोन कुटुंबात हाणामारी झाली. याप्रकरणी पिंपरी पोलिस (pimpri police) ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश मोणीयॉडी थेवर (वय ३२, रा. अण्णासाहेब मगर स्टेडियम रोड, नेहरूनगर, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निजामुद्दीन जावेद शेख, मयुरूद्दीन शेख, जावेद शेख, शहनाज व निजामुद्दीनची आई (सर्व रा. वाघेरे टॉवरजवळ, नेहरूनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

रविवारी (ता. २९) दुपारी एकच्या सुमारास आरोपी निजामुद्दीन हा फिर्यादी यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला. चोरी न करताच तो पळून गेला. दरम्यान फिर्यादी यांच्या आईने चोरचोर म्हणून आरडाओरडा केला. त्यावेळी आरोपींनी ‘आम्ही तुम्हाला चोर दिसतो का’ असे म्हणत फिर्यादी व त्यांच्या आईला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निजामुद्दीन शेख व मयुरूद्दीन शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

तर शहनाज जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नीलेश मोणीयॉडी थेवर (वय ३३), मोणीयॉडी थेवर (वय ५९), मुथ्थुसेल्वी मोणीयॉडी थेवर (वय ५५), वर्षा मोणीयॉडी थेवर (वय २५, सर्व रा. वाघेरे टॉवरजवळ, नेहरूनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीची आई कचरा झटकत असल्याच्या कारणावरून आरोपी नीलेश व मोणीयॉडी यांनी फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी आरोपींच्या घरासमोर गेले असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली. निलेशने विटेच्या तुकड्याने फिर्यादीला मारले. याप्रकरणी नीलेश व मोणीयॉडी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT