पिंपरी-चिंचवड

#LockDown : यात्रा नसल्यामुळे विक्रेत्यांसमोर 'हा' प्रश्न....

संजय बेंडे

भोसरी ः लॉकडाउनमुळे गावांमधील यात्रा झाल्याच नाहीत. त्यामुळे कटलरी, खेळणी, फुगे आणि इतर वस्तू विकणार्‍यांना घरीच बसावे लागले. त्यामुळे हे विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. यात्रेचा हंगाम डोळ्यांदेखत रिकामाच जात असल्याने या विक्रेत्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राची संस्कृती ही खेड्यापाड्यातील गावागावांत जपली जाते. प्रत्येक गावांमध्ये ग्रामदेवतेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये संपूर्ण गाव सजवले जाते. नातेवाईक, मित्रमंडळींना जेवणांसाठी घरी बोलाविले जाते. त्याचप्रमाणे विविध वस्तू विक्रेत्यांची दुकाने गावागावांत सजतात. कुस्त्यांचे जंगी आखाडे होतात. त्याचप्रमाणे तमाशा, भारुड आदींचा आनंदही गावकरी घेतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा           

साधारणपणे जानेवारी ते मे महिन्यात खेडोपाड्यांत यात्रा भरतात. सुगीचे दिवस संपल्यानंतर शेतकऱ्यांना थोडीशी उसंत मिळावी, त्यांची करमणूक व्हावी. त्याचप्रमाणे ग्रामदैवतांची विधीवत पूजा करणे, हाही हेतू जत्रेमागे असतो. जत्रेनंतर शेतकरी खरीप पिकाच्या हंगामासाठी स्वतःला झोकून घेतात.  मात्र, सध्या कोरोनाने राज्यासह देशात थैमान घातल्याने संसर्गापासून वाचण्यासाठी देशात संचारबंदी लागू झाली. त्याचप्रमाणे लॅाकडाउन करण्यात आले.  त्यामुळे गावामध्ये यात्रा साजऱ्या केल्या नाहीत. त्यामुळे कटलरी, खेळणी, स्त्रियांसाठी मेकअपचे साहित्य, फुगे आदींसह विविध वस्तू विकणार्‍यांचा व्यवसायही ठप्प झाला. 

"पावसाळ्यामध्ये कटलरीची दुकाने टाकता येत नाहीत. त्यामुळे यात्रांमध्ये झालेल्या कमाईवर पावसाळ्याचे चार महिने घालवावे लागतात. आता यात्रा बंद झाल्याने पावसाळ्याचे चार महिने कसे घालवायचे, कसे जगायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे."

- ताई सुरेश चौधरी, कटलरी विक्रेत्या, देहूरोड

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"यात्रांमध्ये फुगे, बासरी, लहान मुलांची खेळणी विकून थोडाफार पैसा मिळतो. इतर वेळेस या वस्तूंना अधिक ग्राहक मिळात नाहीत. त्यामुळे  पुरेशी विक्री होत नाहीत. अधिक विक्री करण्यासाठी विविध गावांच्या यात्रांमध्ये हजेरी लावतो. मात्र, आता यात्रा बंद असल्याने या वस्तू विकायच्या कशा, घर चालवायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे."

- सुरेश कलंदर, खेळणी विक्रेते, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT