Rahul-Kalate 
पिंपरी-चिंचवड

राहुल कलाटे यांचा राजीनामा; पिंपरी-चिंचवड शिवसेनेत दोन गट

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा राहुल कलाटे यांना मागितला होता. याबाबत त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस दिली होती. मात्र, या घटनेला २० दिवस उलटूनही कलाटे यांनी राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शहर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली. त्यानंतर काही कालावधीतच कलाटे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले आणि पक्षांतर्गत विरोधकांना शह दिला. यावरून शहर शिवसेनेत महापालिका निवडणुकीच्या काही महिने अगोदरच दुही निर्माण झाल्याचे चित्र आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे नऊ सदस्य निवडून आते आहेत. राहुल कलाटे प्रभाग २५ वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पक्षाने त्यांची गटनेतेपदी वर्णी लावली. दोन वर्षे स्थायी समितीचे सदस्यपदही त्यांनी भूषविले. त्यांचा कालावधी संपला. त्यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी वेळी स्थायी समिती सदस्यपदी नवीन आठ सदस्यांची निवड झाली. शिवसेनेच्या कोट्यातून अश्‍विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते कलाटे यांनी त्यांच्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायीसाठी दिल्याचा आरोप, करत एका गटाने आक्रमक भूमिका घेतली. पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. त्यावर पक्षाने २४ फेब्रुवारी रोजी कलाटे यांना नोटीस देत खुलासा मागविला. १० मार्च रोजी राजीनामा मागितला. तो न दिल्याने दुसऱ्या गटाने पुन्हा तक्रार केली.

दुसरा गट आक्रमक
महापालिकेतील शिवसेना गटनेते कलाटे यांनी पक्षादेश धुडकावत पक्षशिस्तीचे उल्लंघन केले आहे. पक्ष नेतृत्वाने शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचा आदेश देवून महिना होत आला. तरी, त्यांनी राजीनामा दिला नाही. एवढे होऊनही त्यांना पक्षातीलच काही मंडळी पाठिशी घालतात. त्यामुळे पक्षाचे नगरसेवक, शिवसैनिकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. अन्याय झालेले काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात आले असून पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. आगामी काळात याचा शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो, असे पत्र शिवसेना शहर जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्यासह शहरप्रमुख व शहर संघटक पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाला पाठवले आहे.

कलाटे यांचा राजीनामा
पक्षाच्या आदेशानुसार राहुल कलाटे यांनी महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. याबाबत त्यांनी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, आपण एसएमएसद्वारे दिलेल्या निरोजोप्रमाणे सी गटनेतेपदाचा राजीनामा देत आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी मला म्हणणे मांडण्यासाठी पत्र दिले आहे. त्यात मला कारणमिमांसा करण्याचे सांगितले आहे. त्याचीही मी पुर्तता करीत आहे. तत्पुर्वी मला सत्यप्रत व बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT