पिंपरी-चिंचवड

दापोडी-सांगवीकरांना पावसाचा फटका; घरातील पाणी काढण्यातचं गेली रात्र!

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : जुनी सांगवी व परिसरात मंगळवार (ता. २) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने दापोडी-सांगवीकरांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी चेंबर तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले. जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. यामुळे नागरिकांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागला. अनेक रस्त्यावरून पाणी वाहत होते. तर दापोडी येथील नदी किनारा व सखल भागात घरात पावसाचे पाणी निचरा न झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

आधीच कोरोनाचे संकट, त्यात पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. दापोडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नाले सफाई, चेंबर सफाई करण्याचे काम सुरू आहे. येथील दाट लोकवस्तीत अरूंद गल्ल्या आहेत. त्यामुळे जेट मशीनच्या साहाय्याने सफाई करता येत नसल्याने मनुष्यबळाच्या साह्याने या भागातील स्वच्छता करावी लागते. दापोडीत काल रात्री झालेल्या पावसाने येथील चव्हाण चाळ, काची चाळ, सरस्वती अनाथ आश्रम शेजारील भाग, हिवाळे चाळ, विश्वासे चाळ, एसएमस कॉलनी इत्यादी सखल भागातील गल्ल्यांमधून घरात पाणी आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बादलीच्या साह्याने नागरिकांना पाणी काढावे लागले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अचानक घरात आलेले पाणी काढण्यासाठी तारांबळ झाली. घर पुन्हा स्वच्छ करावे लागले. 
- दिपक साळवे, नागरिक 

माझ्या दुकानासमोर पाणी तुंबल्याने तळे साचले होते. 
- शाम लांडगे, नागरीक

प्रभागात पावसाळापूर्व नाले सफाई, स्वच्छतेची कामे काही दिवसांपासून सुरू आहेत. अशा सखल अरूंद गल्ल्यांमधील काम करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- स्वाती काटे, नगरसेविका, दापोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ancient Temple Mystery : खोदकाम सुरू असताना अचानक बाहेर आले प्राचीन मूर्तींचे अवशेष; ऋषिकेशच्या 'या' मंदिराचा विस्मयकारक इतिहास समोर, मूर्ती नेमकी कोणाची?

आधी हिंदू मुलीशी लग्न, धर्मांतर करुन युट्यूबर म्हणतो, 'पुरुषांची नजर मला माहिती, बुरखा घालणं गरजेचं'

Latest Marathi News Live Update : मुंबईतील चारकोपमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा

Gudi Padwa Decoration 2026: गुढी पाडव्याला ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, घरात कधीच भासणार नाही कोणतीही कमतरता

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

SCROLL FOR NEXT