रामकृष्ण मोरे सरांनी जाती धर्मापलिकडे जाऊन व्यापक राजकारण केले : उल्हास पवार sakal
पिंपरी-चिंचवड

रामकृष्ण मोरे सरांनी जाती धर्मापलिकडे जाऊन व्यापक राजकारण केले : उल्हास पवार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : “महाराष्ट्रीतील भीषण दुष्काळ काळात विद्यार्थीची शुल्क माफी, नोकरी बाबत मागण्या मान्य करवून घेण्यासाठी मोरे सरांनी लढा उभा केला व यश मिळवले. जाती धर्मापलिकडे जाऊन व्यापक राजकारण केले. त्यांची विधीमंडळातील भाषणे शब्दफेक अतिशय उत्तम असे, त्यांची पोकळी आज भरून येऊ शकत नाही, ’ अशी खंत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केली.

पिंपरीतील सावित्रीमाई फुले स्मृती स्मारक येथे माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा.रामकृष्ण मोरे सरांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त प्रा.रामकृष्ण मोरे प्रेमी मित्र परिवार व काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या वतीने सरांच्या छायाचित्र प्रदर्शन व स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार विलास लांडे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, देहू येथील सरांच्या भगिणी शामाताई परदेशी, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विलास कामठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक तात्या कदम, आप्पा बागल, विनायक रणसुंभे, सतिश दरेकर, नारायण बहिरवाडे, सदगुरू कदम, प्रसाद शेट्टी, प्रकाश मलशेट्टी, विश्वास गजरमल, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, छायाताई देसले, पुजा बिबवे, के.एम.रॅाय, माऊली मलशेट्टी, के. हरीनारायणन, ईस्माईल संगम, विजय ओव्हाळ, बाबा बनसोडे, आबा खराडे, सौरभ शिंदे, श्याम भोसले, सतिश भोसले, कबीर मोहम्मद उपस्थित होते. दरम्यान, सरांच्या जीवनाकार्यावर आधारित पोवाडा शाहीर सुरेश राव सुर्यवंशी सांगलीकर यांनी सादर केला. या प्रसंगी सर्वपक्षीय उपस्थित मान्यांवरांनी आपल्या जुन्या आठवणी व प्रसंगाना उजाळा देत सरांच्या कार्यांचे व गुणवैशिष्टांचे स्मरण केले.

प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन म्हणाले, “सर राजकारणी नव्हते तर ते कायम सिक्रीय कार्यकर्ते होते, पक्ष कोणताही असो विचार महत्वाचा व काँग्रेस विचार कधीही संपू शकत नाहीत असे ते मानत होते.’’

माजी आमदार लांडे म्हणाले, ‘‘काँग्रेस मधील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. त्यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलविला ते एक व्यासंग असणारे व्यक्तीमत्व होते.’’, “परखड व्यक्तीमत्वाचे धनी असेलेल्या सरांनी कायम राजकारणात पद नाही तर पत महत्वाची असल्याचे नगरसेवक भोईर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

SCROLL FOR NEXT