पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो, आता काही मिनिटांत होणार कोरोना टेस्टिंग 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नवी दिल्लीतील इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट (चाचणी) विकसित केली आहे. त्यामुळे संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणी अहवाल अवघ्या 15 ते 30 मिनिटांत मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पॉझिटिव्ह रुग्ण शोधून त्याच्यावर उपचार करणे सोयीचे होणार आहे. 

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयासह खाजगी आठ रुग्णालयांत आणि 11 कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या रिव्हर्स ट्रान्स्क्रीपिऑन पॉलिमर्स चैन (आरटीपीसीआर) नुसार तपासणी केली जात आहे. मात्र, त्याचा रिपोर्ट येण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे अनेक संशयित तपासणीच्या प्रतीक्षेत राहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर रॅपिड अँटिजेन टेस्ट जलद होणार असून, संसर्गाचे निदान त्वरीत होणार आहे. सध्या वायसीएम, एनआयव्ही, नारी, बीजे मेडिकल कॉलेजसह सात खाजगी लॅबमध्ये स्वॅब तपासणी केली जात आहे. 

रॅपिड टेस्ट उपयुक्त 

कंटेन्मेंट झोनमधील सर्वेक्षणात आढळले संशयित, पॉझिटिव्ह लक्षणे असणारे, हायरिस्क कॉन्टॅक्‍टमधील, पॉझिटिव्ह रुग्णांतील मधुमेह, मूत्रपिंड विकार, फुफ्फुसाचे आजार असणारे, फ्लू दवाखाना व रुग्णालयांत आढळलेले संशयित, ताप- खोकला-दम लागणे अशी लक्षणे असणारे, रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण 90 टक्केपेक्षा कमी असलेले, गरोदर महिला, शस्त्रक्रियेसाठी आलेले अशा रुग्णांसाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट उपयुक्त ठरणार आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये नागरिकांच्या दहा हजार तपासण्यांचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

असे असेल मनुष्यबळ 

अँटिजेन टेस्टिंगसाठी एक नियंत्रण वैद्यकीय अधिकारी, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन स्टाफ नर्स, एक सहायक यांची झोनल रुग्णालय स्तरावर नियुक्ती केली आहे. यासाठी रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्स, वैद्यकीय नोडल अधिकारी यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच, संशयितांचे जागेवरच स्वॅब घेण्यासाठी आठ स्वतंत्र पथक आहेत. त्यात दोन डेंन्टीस्ट, दोन संगणक ऑपरेटर, एक नर्स व एक मदतनीस यांचा समावेश आहे. 

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी 'सार्स कोविड 2' च्या निदानासाठी स्टॅंडर्ड क्‍यू कोविड 19 अँटिजेन डिटेक्‍शन किट (एटीसी) वापराबाबत सूचविले आहे. त्या अनुषंगाने महापालिका रुग्णालयात एटीसी सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT