पिंपरी-चिंचवड

रेशन दुकानदारांना सतावतेय याची भीती 

संजय बेंडे

भोसरी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मे ते जुलैमध्ये शिधापत्रिकाधारकांना इपॉस यंत्रावर अंगठा न घेता धान्य वितरित करण्याच्या सूचना सरकारद्वारे देण्यात आल्या. मात्र, ऑगस्टमध्ये शिधा वाटपासाठी शिधापत्रिकाधारकांचा इपॉसवर अंगठा घेणे दुकानदारांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीत दुकानदारांमध्ये आहे. सरकारकडून दुकानदारांना कोणतेही सुरक्षेचे साधन नाही. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील चौदा रेशन दुकानदारांना कोरोना संसर्ग झाला आहे. यात दोन दुकानदारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन दुकानदार अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या कोरोना संसर्गाचा धोका टळला नसताना शिधापत्रिकाधारकांना त्यांचा अंगठा इपॉस यंत्रावर घेऊन धान्य वितरित करण्याचे आदेश सरकारच्या अन्नधान्य वितरण विभागाद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. वृद्ध नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा इपॉस यंत्र घेत नाही. वृद्ध शिधापत्रिकाधाराकांची संख्या प्रत्येक रेशन दुकानामध्ये पन्नास टक्‍क्‍यांच्या पुढे आहे. त्यामुळे वृद्धांना धान्य वितरित होणार नसल्याचेही रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही रेशन दुकानदारांचा इपॉस यंत्राला विरोध नाही. मात्र, सध्या इपॉस यंत्राद्वारे धान्य वितरित केल्यास ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जाणार नाही. त्यामुळे दुकानदारांसह ग्राहकांनाही कोरोना संसर्गाचा धोका वाढणार आहे. अशा अवस्थेत इपॉस यंत्राची सक्ती करणे चुकीचे आहे. 
- निवृत्ती फुगे, रेशन दुकानदार 

इपॉस यंत्रावर थंब घेऊन शिधा वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनानेच घेतला आहे. शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्यानेच धान्य वितरित करण्यासाठीचा बदल इपॉस यंत्रात केला आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याशियवाय धान्य वितरित करता येणार नाही. या विषयाचे निवेदन रेशन दुकानदारांद्वारे आल्यास शासनाला कळवू. 
- नागनाथ भोसले, नायब तहसीलदार व परिमंडळ अधिकारी, 'फ' प्रभाग 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT