पिंपरी-चिंचवड

पिंपरी : रेशन दुकानदारांनी केली 'ही' नवी मागणी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ग्राहकांना रेशनच्या मालाचे बिल देताना ई-पॉस मशिनवर थंब करण्याऐवजी संगणकीय सॉफ्टवेअर सरकारने विकसित करून द्यावे, अशी रेशन दुकानदारांची मागणी आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने दुकानदारांना ग्राहकांऐवजी दुकानदारानेच धान्य दिल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नावाचे बिल करताना मशिनवर 'थंब' करावे, असा आदेश दिला आहे. मात्र, बहुतेक दुकानदार हे वयाच्या 50 वर्षांच्या पुढचे आहेत. काही जणांचे हाताचे अंगठे वयोमानानुसार, अपघात यासारख्या कारणांमुळे व्यवस्थित काम करीत नाहीत. त्यामुळे मशिनमधून लवकर बिल निघत नाही. त्यामुळे पुढच्या ग्राहकाला धान्य मिळण्यास विलंब होतो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुकानदाराव्यतिरिक्त त्याने सांगितल्यानुसार आणखी दोघांना थंब करता येते. त्यानुसार काहीजणांनी मुलगा, पत्नी अशा कुटुंबातील सदस्यांची नावे नमूद केली आहेत. मात्र, ज्यांचे नाव नमूद आहे, ते नेहमीच घरी उपलब्ध असतात असे नाही. त्यापेक्षा सरकारने या मशिनऐवजी संगणकीय सॉफ्टवेअर दिल्यास अधिक बरे होईल, अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Naxal Surrender News: गडचिरोली सुरक्षा दलांसमोर ११ वरिष्ठ माओवाद्यांची शरणागती; सुरक्षा यंत्रणा ठरतेय यशस्वी, आता उरले केवळ सहा!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

kokan Rehabilitation : कोयना प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळला! न्यायासाठी आता न्यायालयाची दारं ठोठावणार

Latur News: निलंगा वांजरखेडा व सिंधीकामठ बंधाऱ्यांना उच्च पातळी बंधारा; १२३ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT