पिंपरी-चिंचवड

लॉकडाउनमध्येही मोशी 'आरटीओ'ला कोटींचा महसूल

आशा साळवी

पिंपरी : कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन असतानाही गेल्या दहा दिवसात 630 नवीन वाहनांची नोंदणी मोशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. परिणामी या विभागाला सव्वातीन कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मात्र, दरवर्षीचे महसूल वसुली उद्दिष्टपूर्ती दूरच राहणार असल्याची चिन्हे आहेत. 

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी आरटीओ विभागाची दर महिन्याला 50 ते 55 कोटीची कमाई होते. पण यंदा कोरोनामुळे या विभागाला मोठा फटका बसला आहे. वाहन ही गरजेची वस्तू झाली असून, अनेक जण मुहूर्तावर वाहन खरेदी करतात. मात्र, यावर्षी लॉकडाउनमुळे वाहन नोंदणीकरिताचे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे मुहूर्त हुकले. 25 मार्चपासून लॉकडाउन जाहीर केल्यानंतर आरटीओतील विविध कामकाजही ठप्पच झाले. 14 एप्रिलपर्यंत असलेली टाळेबंदी नंतर शिथिल होईल, असे वाटत होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु, तसे न झाल्याने एप्रिल महिना पूर्णपणे लॉकडाउनमध्ये गेल्याने शून्य उत्पन्न मिळाले. सरकारने नियमावलीत बदल केल्यामुळे 18 मेपासून 5 टक्के कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर परिवहन विभागाने काम सुरु केले आहे. त्यांनी ऑनलाईन वाहन नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली.  या दहा दिवसात एकूण 630 नवीन वाहनांची नोंद होताच  दोन कोटी 86 लाख 63 हजार 281, तर इतर करातून एक कोटी रुपये, अशी 3 कोटी 25 लाख रुपयांचा महसुल प्राप्त केल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गेल्या वर्षींच उद्दिष्ट...

गेल्या आर्थिक वर्ष 2019-20मध्ये 655 कोटी रुपये उद्दिष्ट होते. तेव्हा 585 कोटी रुपयांचा महसूल वसूल केला होता. 
 

अशी झाली नवीन वाहनांची नोंदणी 

(18  ते  27 मे 2020 कालावधी )

  • दुचाकी : 338
  • चारचाकी : 286
  • मोटार कॅब : 1
  • ट्रॅक्टर : 5 
  • एकूण नोंदणी : 630

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT