pcmc pune
पिंपरी-चिंचवड

मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा टाहो

कोविड संसर्गामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. आर्थिक अडचणीमुळे रिक्षाचालक संकटात सापडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोविड संसर्गामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. आर्थिक अडचणीमुळे रिक्षाचालक संकटात सापडला आहे. हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी बेकायदा मार्गाने तगादा लावला आहे. फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या मागणीसाठी पिंपरी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बुधवारी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेडच्यावतीने रिक्षांसह मोर्चा काढला. (PCMC News)

निवेदनात म्हटले आहे की, रिक्षाचालकांच्या समस्यांसाठी पोलिस तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, तक्रार देखील दाखल करून घेतली जात नाही. शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालक मालकांचे आरसी बुक कोरे केले पाहिजे. कर्ज माफ झाले पाहिजे. कल्याणकारी महामंडळ स्थापन करून महिना दहा हजार रुपये आर्थिक मदत रिक्षाचालक व मालकांना मिळाली पाहिजे.

टास्क फोर्स स्थापन करून समस्या सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे.कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धनंजय कुदळे, उपाध्यक्ष विजय ढगारे, जाफर शेख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

IND vs ZIM: भारत आणि झिम्बाब्वेचे खेळाडू दुसऱ्या T20I सामन्यात हाताला काळी पट्टी बांधून का उतरले? जाणून घ्या खरं कारण

सध्या काय करतात 'पंढरीची वारी' चित्रपटातील कलाकार? बालकलाकारासह अनेकांचं निधन; केवळ तिघेच जिवंत

Karjat Lonavala railway block : कर्जत-लोणावळा घाटातील तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगात; २५ ते २८ जुलैदरम्यान अनेक एक्स्प्रेस रद्द

SCROLL FOR NEXT