pimpri chinchwad
pimpri chinchwad sakal media
पिंपरी-चिंचवड

‘ओमिक्रॉन’ च्या पार्श्वभूमीवर शहरात आलेल्या नागरिकांची RT-PCR टेस्ट

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना आणि त्यासंदर्भात आवश्यक व योग्य पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आज (ता. ३०) रोजी बैठक झाली.

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मागील १५ दिवसांमध्ये परदेशातुन पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आलेल्या नागरीकांची माहिती पिं. चिं. मनपामार्फत कार्यान्वीत करण्यात आलेल्या कोविड हेल्पालाईन क्रमांक ८८८८००६६६६ वर कळविण्यात यावी.

जेणेकरुन परदेशातुन आलेल्या नागरीकांची RT-PCR टेस्ट करण्यात येईल. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर संस्थात्मक अलगीकरण (Institutional Quarantine) कक्षात ठेवुन वेळेत उपचार करण्यात येतील व सानिध्यात आलेल्या व्यक्तींना गृह अलगीकरण (Home Quarantine) कक्षात राहण्याच्या सूचना देण्यात येतील. जेणेकरुन विषाणूच्या प्रसार टाळण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid-19: 'तो' पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

HSC Result: बारावीत नापास झालाय? टेन्शन नॉट! हे कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

Latest Marathi News Live Update: कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकांना पुणे पोलिसांनी केली अटक

India Head Coach : BCCIसाठी थाला ठरणार मांडवली बादशाह? भारताच्या नव्या कोचच्या निवडीसाठी वापरणार धोनी फॅक्टर

SCROLL FOR NEXT