पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो आरटीओ विभाग आजपासून सुरू झालाय

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प होते. मात्र, आता 'अनलॉक' केल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज आजपासून (ता.22) पूर्ववत झाले आहे. मात्र, पक्के आणि शिकाऊ परवान्याप्रमाणे आता कार्यालयामध्ये प्रत्येक कामासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मागील काही दिवसांपासून शिकाऊ आणि पक्के लायसन्स देण्याचे कामकाज बंद ठेवले होते. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे, वायुवेग पथक यांचे काम पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मोशी आरटीओ कार्यालयाने सर्वच कामांसाठी अपॉईंटमेंट घेणे बंधनकारक केले आहे. वेळ घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही. लायसन्स आणि वाहन विषयक कामांसाठी सकाळी आठ वाजता आगाऊ वेळ घ्यावी. त्यासाठी निर्धारण प्रणाली (अपॉईंटमेंट) सुरू केली आहे. आरटीओ कार्यालयातील उपलब्ध कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संख्येनुसार कामकाज सुरू करण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी घेणार काळजी 

लर्निंग लायसन्सची संगणक चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फूट अंतर राखले जाणार आहे. एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, की बोर्ड सॅनिटाईज करणार, तसेच अर्जदारांनी आरटीओ कार्यालयात येताना मास्क, हॅन्डग्लोज घालून प्रवेश करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये वैधता संपलेल्या लर्निंग लायसन्सची वैधता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स धारकांनी आपल्या वेळेत पक्के लायसन्स चाचणी देऊन घ्यावे. मोटार ड्रायविंग स्कूलच्या वाहनावर चाचणी घेतल्यास एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज केले जाईल. त्यानंतर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घेतली जाईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT