पिंपरी-चिंचवड

पुण्यातील संशोधकांना पहिल्यांदाच मिळालंय एवढं संशोधन अनुदान!

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : लोहगाव येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरींगमधील (डीवायपीएसओई) प्राध्यापक डॉ. एस. एम. खैरनार आणि डॉ. सानिया अन्सारी यांना केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून 81 लाख रुपयांचे संशोधन अनुदान देण्यात आले आहे. 

स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर वॉटर रिसोर्सेस ऍन्ड इंप्लिमेंटेशन ऑफ नॉवेल बायोटेक्‍निकल ट्रिटमेंट सोल्यूशन्स ऍन्ड गुड प्रॅक्‍टिसेस (स्प्रिंग)असे त्यांच्या बहु-अनुशासनात्मक (मल्टि डिसिप्लिनरी) प्रकल्पाचे शीर्षक आहे. पुण्यातील संशोधकांना प्रथमच आयआयटी आणि इंडिया-युरोप आंतरराष्ट्रीय यांच्या संयुक्त सहकार्याने प्रोटोटाईप, ऑटोमेशन आणि संगणकीय चाचणीच्या विकासात्मक संशोधनासाठी 81 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डीएसटी, नवी दिल्ली येथील सादरीकरणावरुन संपूर्ण देशभरातून 72 पैकी फक्त 8 प्रकल्पांची निवड झाली आहे. 'डीवायपीएसओई'ही देशातील एकमेव खासगी संस्था असून, या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणून संस्थेची निवड झाली आहे. या प्रकल्पात 3 आयआयटी, दोन स्वायत्त आणि 1 स्वयंसेवी संस्था तसेच नॉर्वे, हंगेरी, फिनलॅंड आणि पोर्तुगाल या देशांतील 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

युरोपियन युनियनने केवळ 8 भारतीय आणि पाच आंतरराष्ट्रीय भागीदारांसाठी 6 कोटी 11 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. 'डीवायपीएसओई'ला 1 जून 2020 पासून पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही अनुदान प्राप्त झाले आहे. देशाकडून डॉ. संजुक्ता पात्रा, आयआयटी, गुवाहाटी आणि युरोपियन युनियनकडून डॉ.रजनीश कौर कॅले, युनिव्हर्सिटी ऑफ ट्रोम्से (नॉर्वे) हे प्रकल्प समन्वयक म्हणून पुढील वर्षांसाठी कार्यभार संभाळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT