Safety precautions During Monsoon Treks esakal
पिंपरी-चिंचवड

Monsoon trekking safety tips: सह्याद्रीत पावसाळी भटकंती करताय? तर ‘ही’ खबरदारी घ्यायलाच हवी! नवे नियम आणि हेल्पलाइन लिहून घ्या

What Precautions Should You Take Before a Trek? पावसाळ्यात सह्याद्रीत डोंगरदऱ्यांत वाढलेले धबधबे आणि निसरड्या वाटा – अशा वेळी गिर्यारोहकांनी योग्य खबरदारी घेणे अत्यावश्यक

CD

‘‘पावसाळ्यात सह्याद्रीत भटकंती करताना पुरेशी सावधगिरी बाळगावी. पाऊस वाढल्यास निसरड्या वाटा, दरडी, धुके, धबधबे आणि ओढ्या-नाल्यांचे प्रवाह टाळावेत,’’ असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केले आहे. दुदैवाने, काही दुर्घटना घडल्यास ७६२०२३०२३१ या २४ x ७ हेल्पलाइन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा, असेही महासंघाने म्हटले आहे.

संपूर्ण हिरवाईने नटलेला परिसर... डोंगरदऱ्यात खळखळून वाहणारे मनमोहक धबधब्यांखाली ओलेचिंब भिजण्यासाठी पर्यटकांची पावले आपसूकच सह्याद्री पर्वतरांगांकडे वळतात. परंतु, भटकंती करताना पुरेशी काळजी न घेतल्यास आनंदाचे क्षण लगेच दुःखात बदलू शकतात. हे लक्षात घेऊन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषीकेश यादव, सचिव डॉ.राहुल वारंगे यांनी त्याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

पावसाळ्यात निसर्गात भटकंती जरूर केली पाहिजे. परंतु, कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ओळखीच्या व अनुभवी चमूसोबत भ्रमंतीला जावे, समूहातील संख्या मर्यादित व नियोजन करता येईल, एवढीच असावी. प्रथमोपचाराचे साहित्य असावे.
लीडर / ग्रुप यांची माहिती घरी किंवा जवळच्या व्यक्तीस द्यावी. आवश्यकतेनुसार स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा. पावसाचा अंदाज पाहूनच भटकंतीचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी त्या निवेदनात केले आहे.

आणखी काय काळजी घ्याल ?

- धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता. त्यामुळे, फिरताना सावधानता हवी
- किल्ल्यांवरील अवशेषांवर चढू नये, एखादा दगड निसटून अपघात होऊ शकतो.
- आपत्कालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा.
- अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे.
- किल्ले, जंगल, धबधब्यांजवळ कचरा करू नका.
- पावसात डोह, धरण, ओढा, नदीत उतरू नये.
- धबधब्याच्या पाण्यासोबत दगड पडण्याची शक्यता असते.
- जास्तीचे कोरडे खाद्यपदार्थजवळ ठेवावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

Ambegaon Super 23 Initiative: आंबेगाव सुपर 23 उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा गौरवोद्गार

Asthma Day Warning: जागतिक दमा दिनानिमित्त तज्ज्ञांचा इशारा: वसई-विरार, मीरा रोड व मुंबईत वाढते श्वसन आजार

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

SCROLL FOR NEXT