Sakal Natya Mahotsav sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Natya Mahotsav : अक्षयतृतीयेनिमित्त ‘सकाळ’तर्फे १० ते १२ मे दरम्यान नाट्य महोत्सवाचे आयोजन

अक्षयतृतीयेनिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजित नाट्य महोत्सवाचे आता ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’ यावर तिकिटे उपलब्ध.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - अक्षयतृतीयेनिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजित नाट्य महोत्सवाचे आता ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’ यावर तिकिटे उपलब्ध आहेत. महोत्सवामध्ये भाऊ कदम, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे, ओंकार भोजने, काजल काटे, प्रिया करमरकर, अमोल कुलकर्णी आदी कलाकारांचा आविष्कार बघायला मिळणार आहे.

सध्या उन्हाळा सुरू आहे. शाळांना सुट्ट्या आहेत. विरंगुळा म्हणून कुटुंबीयांसह फिरायला जायचं म्हटलं तर प्रचंड ऊन आहे. अशावेळी मन ताजंतवानं करणारं साधनं म्हणजे नाटक आणि चित्रपट. यातील नाटकांची आणि जोडीला कधी मनाला रुंजी घालणाऱ्या तर कधी खळखळून हसविणाऱ्या कवितांचा हलका-फुलका कार्यक्रम १० ते १२ मे दरम्यान ही मेजवानी सर्वांना उपलब्ध होणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘सकाळ नाट्य महोत्सव’ आयोजित केला आहे. त्याअंतर्गत ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा निखळ मनोरंजनाचा हलका-फुलका प्रयोग १० मे रोजी होईल. ११ मे रोजी ‘तू म्हणशील तसं!’ आणि १२ मे रोजी ‘करून गेलो गाव’ ही नाटकं होतील.

संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास विशेष सवलत दिली जाणार आहे. महोत्सवाचे सहप्रायोजक चिंचवड येथील ऑक्सिकेअर हॉस्पिटल आहे. ऑनलाइन बुकिंग उपलब्ध आहे.

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)

सीझन तिकीट (तळमजला) - १००० रुपये

सीझन तिकीट (बाल्कनी) - ८०० रुपये

प्रतिनाटक तिकीट (तळमजला) - ४०० रुपये

प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) - ३०० रुपये

महोत्सवाचे वेळापत्रक

शुक्रवारी (ता. १०) रात्री ९.३० वा. - संकर्षण व्हाया स्पृहा

शनिवार (ता. ११) रात्री ९.३० वा. - तू म्हणशील तसं!

रविवार (ता. १२) सायंकाळी ६.०० वा. - करून गेलो गाव

फोन बुकिंग - ८९७५२३७०४१

ऑनलाइन बुकिंग : ऑनलाइन बुकिंग - https://in.bookmyshow.com; www.ticketalay.com/ticketalay app

अधिक माहितीसाठी संपर्क - सचिन - ९७३०९५९६९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य सरकारचा जीआर; 'या' कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

MI vs GT Live : ८ चौकार,७ षटकार! तिलक वर्माचे वादळ घोंगावले... ठोकले IPLमधील त्याचे पहिले शतक, मुंबई इंडियन्सच्या १९९ धावा

Latest Marathi News Live Update: दिल्ली उच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार पीडितेची याचिका फेटाळली

MI vs GT Live : अरे, ए काय खेळतोस! हार्दिक पांड्या Live मॅचमध्ये तिलक वर्माला बडबडला... त्यानंतर काय घडले पाहा... Video Viral

MI vs GT Live : सूर्यकुमार यादवचे 'दांडे' उडाले! कागिसो रबाडाची 'पॉवर'; मुंबई इंडियन्सची हालत ६ षटकांतच झाली खराब Video Viral

SCROLL FOR NEXT