Sakal Vastu Property Expo sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vastu Property Expo : आता आयटी परिसरात घर घेण्याची सुवर्णसंधी

आयटी पार्क हिंजवडीत लाखो आयटी अभियंते नोकरी करतात. त्यामुळे साहजिकच हे अभियंते कामाच्या आसपास घर घेण्यासाठी आग्रही असतात.

सकाळ वृत्तसेवा

वाकड -आयटी पार्क हिंजवडीत लाखो आयटी अभियंते नोकरी करतात. त्यामुळे साहजिकच हे अभियंते कामाच्या आसपास घर घेण्यासाठी आग्रही असतात. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क (आयटी पार्क), तर दुसऱ्या बाजूला वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे आहे.

सुंदर विकास आराखडा (डीपी प्लॅन) असल्याने ही गावे दिवसेंदिवस स्मार्ट होत आहेत. त्यातच हा भाग एज्युकेशन हब म्हणूनदेखील उदयास आला आहे. त्यामुळे या भागात आलिशान गृहसंकल्प उभारले जात असून, त्या घरांना चांगली मागणी आहे.

याच भागात ‘सकाळ’ माध्यम समूहाने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घर घेण्यासाठी चांगली संधी आणली आहे. येत्या १२ व १३ ऑगस्ट रोजी ताथवडे येथे ‘वास्तू एक्स्पो’ आयोजित केला आहे. दळण-वळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असल्यास निश्चितच विकासाला चालना व मोठी गती प्राप्त होते. सुनियोजित विकसित होत असलेला वाकड-हिंजवडी परिसरात उच्च शिक्षण देणारी अनेक नामांकित महाविद्यालये व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असंख्य शाळा हाकेच्या अंतरावर आहेत.

मुंबई-बेंगळुरू महामार्ग, महा मेट्रो प्रकल्प, प्रस्तावित रिंगरोड, वाकड-हिंजवडी तसेच बालेवाडी-म्हाळुंगे ते हिंजवडी, बालेवाडी-वाकड पूल यासह अन्य पर्यायी रस्ते तसेच पाषाण-सुस लिंक रोड आदी विकासाला पोषक ठरणाऱ्या व बांधकाम क्षेत्राला मोठी गती प्राप्त करून देणाऱ्या महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे घराजवळच नोकरीचे ठिकाण, हाकेच्या अंतरावर मुलांचे शिक्षण, उत्तम कनेक्टिव्हिटी, उत्तम डीपी प्लॅन, प्रशस्त रस्ते, मुबलक पाणी, विविध आरक्षणे या सर्व जमेच्या बाजू बनल्या आहेत.

या भागात इंदिरा महाविद्यालय, बालाजी कॉलेज, जेएसपीएम शैक्षणिक संकुल, कॉम्प्युटर ऑफ सायन्स, आयआयईबीएम व अन्य मोठ्या महाविद्यालयासह माउंट लिटेरा स्कूल, युरो, अक्षरा, अश्विनी इंटरनॅशनल, ब्ल्यू रिज, पवार पब्लिक स्कूल, महिंद्रा अशा एकशे बढकर एक शाळा आहेत. वाकड भागात लवकरच शहरातील मोठा ‘फिनिक्स मॉल’ येत आहे.

‘सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो’त काय?

  • वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर परिसरातील घरांचे पर्याय

  • एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची अर्थात ‘प्रिमियम प्रापर्टी’ची माहिती मिळणार

  • वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचकेपर्यंतच्या घरांची माहिती मिळणार

काय? कधी? कुठे? केव्हा?

  • काय? : सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो

  • कुठे? : सिल्व्हर बॅंक्वेट हॉल, रावेत बीआरटी रस्ता, डांगे चौकाजवळ, रामनगर, ताथवडे

  • कधी? : शनिवार व रविवार अर्थात १२ व १३ ऑगस्ट २०२३

  • केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८ (दोन्ही दिवस)

  • प्रवेश व पार्किंग : विनामूल्य

  • संपर्क : ९८८१७१८८४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT