Sakal Vastu Property Expo sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vastu Property Expo : पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचे स्वप्नातील घर साकारण्यासाठी होणार मदत

ताथवडे-रामनगर येथील सिल्व्हर बॅंक्वेट हॉल येथे ‘सकाळ’ने दोन दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो’ भरविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘पिंपरी चिंचवड शहरात घरांना मोठी मागणी आहे. अनेक विकसकांनी चांगले प्रकल्प राबवले आहेत. त्यांना सर्वप्रकारच्या सुविधा महापालिका पुरवत आहे. गेल्या दहा वर्षात वाढत्या लोकसंख्येनुसार शहरीकरणाचा विकास ७० टक्के आहे. त्यामुळे झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात तिसऱ्या क्रमांकावर, तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

‘सकाळ’च्या प्रॉपर्टी एक्स्पो वास्तू प्रदर्शनांमुळे शहरवासीयांचे स्वप्नातील घर साकारण्यासाठी मदत होणार आहे.’, असे प्रतिपादन महापालिका शहर अभियंता मकरंद निकम यांनी ताथवडे येथे शनिवारी (ता. १२) केले.

ताथवडे-रामनगर येथील सिल्व्हर बॅंक्वेट हॉल येथे ‘सकाळ’ने दोन दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो’ भरविला आहे. शहराच्या विविध भागांतील गृह, व्यावसायिक आणि प्लॉट्सची माहिती एकाच छताखाली देणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे शनिवारी निकम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिमाखात उद्‌घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बियेगा रिॲलिटीचे विशाल सैंदान, क्रिसालाचे संदीप दवे, ऐश्‍वर्यम ग्रुपचे प्रेम मेनन, हरीविश्‍वा डेव्हलपर्सचे मनोज डहाके, ऑक्टोपस आर्मचे होम सोल्युशलनचे श्रीकांत सोमवंशी, सिल्व्हर बॅंक्वेट हॉलचे मालक अनिकेत पवार, रविमा ग्रुपचे नागेश कांबळे, समर्थ डेव्हलपर्सचे विकी भानुशाली उपस्थित होते. या एक्स्पोला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

निकम म्हणाले की, ‘सकाळ’चा वास्तू प्रदर्शनाचा हा उपक्रम चांगला असून, यातून आपण नवीन लोकांशी जोडले जातो. त्या त्या भागात, असे प्रदर्शन भरवल्याने ग्राहकांनाही सोयीचे ठरते आणि यातून गृहप्रकल्पांच्या विक्रीस चांगला प्रतिसाद मिळतो, ही चांगली बाब आहे.

Sakal vastu Property Expo

घर घेण्यासाठी नागरिकांची पहिली पसंती पिंपरी चिंचवड शहराला मिळत आहे. शहरातील कनेक्टिव्हिटी वाढत आहे. विस्तारत असलेल्या या नागरी सेवांचा फायदा घेता येवू शकतो, असे अनेक प्रकल्प या एक्स्पोत असणार आहेत. वाढत्या शहरीकरणानुसार महापालिका सुविधा पुरवत आहे. यापुढेही आम्ही नागरिकांना सुविधा पुरवू.’

‘सकाळ’च्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो’त २० हून अधिक विकसकांचे १०० पेक्षा जास्त प्रकल्प मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनात वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर परिसरातील ‘वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचके’पर्यंतच्या प्रकल्पातील आलिशान सदनिकांचे विविध पर्यायांची माहिती उपलब्ध आहे.

एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची ‘प्रिमियम प्रॉपर्टी’ची माहिती ग्राहक घेताना दिसून आले. विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी गृहकर्जासंदर्भात माहिती नागरिक घेत होते. सदनिकांची माहिती घेण्यासह खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पहिल्या दिवसापासूनच गर्दी झाली होती. शंकांचे निरसनही या प्रदर्शनात होत आहे. कुटुंबाची गरज लक्षात घेता सदनिका खरेदी करू इच्छिणाऱ्यांना हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे. रविवार (ता.१३) हा प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे.

‘सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो’त काय?

  • वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर परिसरातील घरांचे पर्याय

  • एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार

  • वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचकेपर्यंतच्या आलिशान घरांची माहिती मिळणार

  • विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी गृहकर्जासंदर्भात माहिती देणार

काय? कधी? कुठे? केव्हा?

  • काय? : सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो

  • कुठे? : सिल्व्हर बॅंक्वेट हॉल, रावेत बीआरटी रस्ता, डांगे चौकाजवळ, रामनगर, ताथवडे

  • कधी? : रविवार १३ ऑगस्ट २०२३

  • केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८

‘घर खरेदीचा निर्णय घेणे सुखकर’

पिंपरी - ‘हिंजवडीत असलेले आयटी क्षेत्र व त्यावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था वाढतच आहे. त्या अनुषंगाने वाढत असलेल्या पायाभूत सुविधांचा लाभ घेता येऊ शकणारे प्रकल्प ‘सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो’मधून नागरिकांना पहायला मिळाले आहेत. एकाच छताखाली नामांकित बांधकाम व मोठ्या गृहप्रकल्पांची माहिती ग्राहकांना मिळाली. घर खरेदीसाठी ही एक मोठी संधी आहे. ‘सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो’प्रदर्शनामुळे घर खरेदीचा निर्णय घेणे सुखकर होत आहे, अशा शब्दात ग्राहकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

‘सकाळ’च्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो’प्रदर्शन उपक्रम चांगला आहे. या प्रदर्शनातून वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर या परिसरातील घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. माझ्या बजेटमध्ये घर उपलब्ध आहेत.

- कोमल पंडित, ग्राहक, नवी सांगवी

चांगल्या गृहप्रकल्पांची माहिती उपलब्ध आहे. ‘सकाळ’च्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो’प्रदर्शनातून काही ठिकाणच्या गृहप्रकल्पांची माहिती घेतली आहे. पिंपळे गुरव या परिसरात आम्हाला घर घ्यायचे आहेत. त्या अनुषंगाने प्रदर्शनाला सहकुटुंब भेट दिली आहे.

- नम्रता धावणे, कासारवाडी

मी चऱ्होलीवरून आलो आहे. शहराच्या सर्व भागात सध्या झपाट्याने विकासकामे सुरू आहे. यात पश्‍चिम भाग देखील आघाडीवर आहे. ‘एक्स्पो’मधील उत्तम प्रकल्पांची माहिती मिळाली आहे. प्रदर्शनातील २ प्रकल्प आवडले आहेत. मी लवकरच निर्णय घेणार असून, स्वप्नातील घर साकारणार आहे.

- सूरज हुकिरे, चऱ्होली

‘एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची अपेक्षित माहिती मिळाली. ‘सकाळ’च्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो’प्रदर्शनाला मी प्रथमच आलो आहे. ताथवडे, वाकड, पिंपळे सौदागर या परिसरात ‘थ्री-बीएचके’ घेण्यासाठी विचाराधीन आहे. त्यासाठी घरांची माहिती घ्यायला आलो होतो. घरांच्या किमती आमच्या बजेटमध्ये आहेत. या प्रदर्शनात २ प्रकल्प आवडले आहेत.

- सुनील राव, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT