HSC CBSE Class students sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vidya : बारावीनंतर कुठे घ्यायचा प्रवेश? ‘सकाळ’तर्फे उद्या करिअरबाबत मार्गदर्शन, शंकांचे होणार निरसन

मनात काही शंका आहेत. त्यांचं निरसन करून मार्गदर्शन हवं आहे. तर, मग येणारा गुरुवार (ता. १५) तुमच्यासाठी खास मार्गदर्शन घेऊन येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - तुम्ही बारावी उत्तीर्ण झालात. आता इंजिनिअरिंग करायचंय. बीसीए, बीबीए, फार्मसी, बीएस्सी, बीएड, बी. डिझाइन, एमबीए, एमसीए, आर्किटेक्चर करायचंय. त्यासंबंधीच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती जाणून घ्यायची आहे.

मनात काही शंका आहेत. त्यांचं निरसन करून मार्गदर्शन हवं आहे. तर, मग येणारा गुरुवार (ता. १५) तुमच्यासाठी खास मार्गदर्शन घेऊन येत आहे. कारण, ‘सकाळ विद्या’, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड विद्यापीठ यांच्यातर्फे विद्यार्थी व पालकांसाठी चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यात तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तुमच्या सर्व शंकांचे निरसन होणार आहे.

सीईटी किंवा जेईईच्या पर्सेन्टाईलनुसार ऑप्शन फॉर्म कसा भरावा, डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया, ‘पीसीएम’मध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास उपलब्ध पर्याय, कॉलेजचे कट-ऑफ शैक्षणिक कर्ज व स्कॉलरशिप विषयी माहिती, बी. व्होकेशनल कोर्स बद्दल माहिती, प्रवेशाच्या फेऱ्या किती व कशा होणार? इंजिनिअरिंग प्रवेशावेळी शाखा कशी निवडावी?, विद्यार्थी व पालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, या चर्चासत्रातून मिळतील.

चर्चासत्राविषयी...

काय? : बारावीनंतरच्या उच्चशिक्षणाची प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शन चर्चासत्र

कधी? : गुरुवार, ता. १५ जून

केव्हा? : दुपारी ४.३०

कुठे? : पीसीईटी सभागृह, पीसीसीओई कॉलेज, सेक्टर २६, आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ, प्राधिकरण.

नोंदणीविषयी...

प्रवेश : विनामूल्य

नोंदणी : नावनोंदणी आवश्यक

प्राधान्य : प्रथम येणाऱ्यास

संपर्क : ८३७८९८७८३६, ९९२२२४७५५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT