Omicron variant sakal
पिंपरी-चिंचवड

ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी नमुने रवाना

नायजेरियातून आलेले तीन रुग्ण कोरोनाबाधित

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत जोखमीच्या नायजेरिया देशातून आलेले दोन जण आणि त्या दोघांच्या रुग्णांच्या संपर्कात आलेला एक जण असे तीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्या प्रवाशांच्या नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. हे प्रवासी कोरोनाबाधित असले तरी लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेच्यावतीने परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नायजेरिया या देशांमधून ता.२५ नोव्हेंबर रोजी आलेल्या दोघांचे कोविड अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्या दोघांच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोविड चाचणी करण्यात आलेली असून यामधील संपर्कातील एक व्यक्तीचा सोमवारी (ता.३०) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

तसेच या नागरिकांचे नवीन ‘ओमिक्रॉन ’ या कोरोनाच्या व्हेरिएंटच्या तपासणी कामी घशातील द्रवाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंग (Genome seauencing) करिता एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आलेले आहेत.‍ सध्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे, असे ११ देशांमधून जे प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये बाधित आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहेत.

सर्वांची प्रकृती स्थिर

नायजेरिया मधून आलेल्या २ व संपर्कातील १ अशा ३ रुग्णांचे कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेले असून त्यांना महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. संपर्कामधील नागरिकांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणू आढळून येत असून नायजेरिया या देशांमध्ये विषाणू अद्याप आढळून आलेला नाही. जे प्रवासी बाधित आढळणार नाहीत त्यांचेही विलगीकरण केले जाणार आहे. सात दिवसानंतर पुन्हा आरटीपीसआर चाचणी केली जाईल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

महापालिका प्रशासनही अलर्टवर

महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, भाईंदर, डोंबिवली आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. त्यामुळेच त्या त्या शहरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केलं जातंय. महापालिका प्रशासनही अलर्टवर आहे. पण हे सहाही रुग्ण हे ओमिक्रॉन विषाणूने संक्रमित आहेत की नाही याचा चाचणी रिपोर्ट येणे अजून बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT