पिंपरी-चिंचवड

तिची व्यथा ऐकून पोलिसाने हे केलं...

मिलिंद संधान

नवी सांगवी ( पुणे ) : अठरा विश्व दारिद्र्यात जगणाऱ्याला रोजच्या उपासमारीच तसं नवल नाही. परंतु, नवजात बालकाचा लॉडाउनमध्ये सांभाळ कसा करायच्या या विवंचनेत सापडली ही माऊली व तिच्या तान्हुल्याच्या मदतीला सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार रोहिदास बोऱ्हाडे धाऊन गेले. बाळंतणीला रोज दोन वेळचे जेवण आणि बाळंतविड्यासाठी पाच हजार रुपये देऊन खाकी वर्दीतील देवदूत असल्याची प्रचिती दिली. 

पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्त्या संजिवनी पुराणीक यांना घरकाम करणाऱ्या या बाळंतणीची विवंचना समजली. तिचा नवरा बिगारी कामगार, त्यातच सुरू असलेले लॉकडाउन या मुळे त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली. या गरिब कुटुंबाची व्यथा पुराणीक यांनी बोऱ्हाडे यांना सांगितली. बोऱ्हाडे यांचा एक मे रोजी वाढदिवस असतो. त्यांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करता या बाळंतणीची सांगवीतील महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन भेट घेतली. तिला बाळंतविड्यासाठी पाच हजार दिले व महिनाभर दोन वेळच्या जेवणाच्या डब्याचीही सोय केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर तालुक्यातील देवळे गावी बोऱ्हाडे यांचे बालपण गेले. वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले बोऱ्हाडे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिसात भरती झाले. दुसऱ्याच्या अडचणीत ते कायमच धावून जातात. लॉकडाउनच्या काळात त्यांनी केलेली ही मदत न विसरण्यासारखी आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT