पिंपरी-चिंचवड

Video :...म्हणून पिंपरीतील सॅनिटायझर टनेल बंद

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी ठिकठिकाणी व्यक्ती, कंपन्या यांच्या वतीने बसविण्यात आलेले सॅनिटायझर टनेलपैकी काही बंद आहेत. तर काही व्यवस्थित सुरू असल्याचे शनिवारी (ता. ९) दिसून आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिस आयुक्त कार्यालय, महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहरातील विविध पोलिस ठाणी, भाजी मंडई आदी सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले होते. काही कंपन्यांनी अशी टनेल मोफत बसविली होती. एका लोखंडी चौकटीभोवती प्लॅस्टिकचा जाड कागद लपेटून हे टनेल केले आहे. आतील बाजूने दोन बारीक पाईप लावले आहेत. या चौकटीच्या बाहेर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या टाकीत सॅनिटायझर भरलेले असते. आतील बाजूच्या नळीला टाकीतील पाईप जोडलेला असतो. जेव्हा एखादी व्यक्ती या टनेलमधून जाते, तेव्हा त्याच्यावर सॅनिटायझरचा शिडकावा होतो. 

कोठे बंद-कोठे सुरू

पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि इमारतीलगत, असे दोन सॅनिटायझर टनेल होते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने सॅनिटायझर टनेलमधून जाणे आरोग्यास अपायकारक असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिस आयुक्तालयासह विविध पोलिस ठाण्यांमधील टनेल बंद करण्यात आली आहेत. चिंचवडगाव-काळेवाडी रस्त्यावरील तालेरा मैदानावर सध्या तात्पुरत्या स्वरूपात भाजीमंडई भरते. तेथेही अशाच पद्धतीचे टनेल बसविण्यात आले होते. भाजी मंडई सुरू झाल्यानंतर सुरवातीचे काही दिवस ते व्यवस्थित सुरू होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते बंद आहे. त्याऐवजी मंडईत जाणाऱ्या ग्राहकाच्या हातावर महापालिकेच्या कर्मचारी सॅनिटायझरचे काही थेंब टाकतो. त्यानंतरच ग्राहक पुढे भाजी खरेदीसाठी जातो. या टनेलमधून गेल्यानंतर हाताची त्वचा काळी पडते, अशा तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्यामुळे अखेर स्प्रिकलिंग थांबविण्यात आले आहे. मोरवाडी येथील सम्राट चौकाजवळील मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या भाजीमंडईच्या आवारात आणि महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारातील टनेल मात्र, सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजीनगरमध्ये तणाव! ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; जोरदार घोषणाबाजी

Dark Circle Remedy: प्रियांका चोप्राची आई मधु चोप्राने दिलेल्या टिप्सने दूर होतील डोळ्याखालील काळे डाग

PM Modi: 'काँग्रेस देशाला पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवत आहे..', PM मोदी यांचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update: संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने; दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Uddhav Thackeray : मोदींना महाराष्ट्र दिल्ली पाहू देणार नाही! ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात,आता वानप्रस्थाश्रमात जा

SCROLL FOR NEXT