Bhosari Entrance Gate
Bhosari Entrance Gate sakal
पिंपरी-चिंचवड

Modern Bhosari : प्राचीनत्व जपणारी आधुनिक भोसरी

संजय बेंडे

प्राचीन काळापासून भोजापूर, भवसरी अशा नावाने प्रवास करत आधुनिक जगात नावारूपास आलेल्या भोसरीने शहरात वेगळा ठसा निर्माण केला आहे. झपाट्याने शहरीकरणाकडे मार्गक्रमण करत असतानाही भोसरीकरांनी जत्रा-उत्सव, बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा, तालीम मंडळ जपत गावपण जपले आहे.

भोसरीकरांचा शेतीसह दूध विक्रीचा व्यवसाय प्रमुख होता. दूध पुरविणाऱ्या गवळ्याचे गाव म्हणूनही ओळख होती. गावाला यशस्वी अशी कुस्तीगीरांची परंपरा आहे. पूर्वी घरटी एक पहिलवान असायचा. राज्याच्या प्रत्येक भागात जत्रेत भोसरीचे पहिलवान आखाडा गाजवायचे. त्यात इतर गावांच्या पहिलवानास भोसरीतील पहिलवानांचा जोड असायचा. त्यामुळे ‘बारा गावे दुसरी, तेव्हा एक गाव भोसरी’ असे म्हणण्याचा प्रघात पडला.

भोसरीतील बहुतांश मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. देवी-देवतांच्या मूर्ती प्राचीनतेला उजाळा देतात. परिसरात सापडलेले वीरगळ, शीलास्तंभ, शिलाप्रकोष्ट, शीलावर्तुळे, काही प्रमाणात उरलेली तटबंदी आदींवरून गावाच्या प्राचीन इतिहासाला उजाळा मिळतो.

भोसरी गावची जत्रा

श्री भैरवनाथ महाराज हे भोसरीचे ग्रामदैवत. हनुमान जयंतीनंतर भोसरी गावची जत्रा भरते. छबिना, चक्रीभजन, तमाशा, बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा आदींचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक जमतात. काही वर्षांपूर्वी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गावची जत्रा एकाच दिवशी येत होती. जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रम भोसरीत घेतले जातात. ग्रामस्थांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला.

गणपती उत्सव

भोसरी परिसरात गणपती उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवात विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी भोसरीतील गणपतींचे विसर्जन एक दिवस अगोदर करण्याची प्रथा आजतागायत सुरू आहे.

कामगारनगरी

भोसरी एमआयडीसीची स्थापना १९६२ मध्ये झाली. एमआयडीसीने मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले. कंपन्यांमुळे भोसरी परिसरात कामगारांचे वास्तव्य वाढले. त्यामुळे भोसरीची कामगारनगरीही झाली आहे.

शहरात केंद्रस्थानी

भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी ग्रामपंचायतींची मिळून नगरपालिका झाली. पुढे नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. महापालिकेद्वारे भोसरी गावजत्रा मैदानात मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, शंभर बेडचे रुग्णालय झाले. कबड्डी प्रशिक्षण केंद्र, आठ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या प्रेक्षा गॅलरीसह खेळाच्या मैदानाचेही काम सुरू आहे. शहरातील पहिल्या मत्सालयाचे कामही सहल केंद्रातील तळ्याजवळ सुरू आहे. त्यामुळे भोसरी पिंपरी-चिंचवड शहराच्या केंद्रस्थानी आहे.

ऐतिहासिक शिवसृष्टी

लांडेवाडी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला उजाळा देणारे भव्य म्युरल्स आहेत. बाल शिवबा आणि राजमाता जिजाऊंचे शिल्प असलेली मेघडंबरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा आणि रायगड दरवाजाची प्रतिकृतीसह ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमहर्षक इतिहास येथे उभा राहिला आहे.

तालिम मंडळे, कबड्डी संघ

भोसरीतील लांडगे, लांडे, गव्हाणे, पठारे, फुगे, डोळस, गवळी, माने आदी बहुल वस्तीभागात एकूण सुमारे सोळा तालीम मंडळे अस्तित्वात होती. सध्या लांडगे लिंबाची तालीम मंडळ, गव्हाणे तालीम मंडळ, पठारे तालीम मंडळ, फुगे-माने तालीम मंडळ, मधले फुगे तालीम मंडळ, डोळस तालीम मंडळ आदी अस्त्वित्वात आहेत. काही मंडळांनी कुस्तीच्या आखाड्यासह आधुनिक जीमचेही साहित्य ठेवून आधुनिकतेची कास धरली आहे. भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघाद्वारे राज्याला विविध खेळाडूंसह हरहुन्नरी पंचही मिळवून देण्याचे काम केले आहे.

कुस्ती, सांप्रदायिक, कबड्डी आदींसह इतरही क्षेत्रांत इतर गावांच्या तुलनेत भरीव योगदान आहे. कोल्हापूरच्या आखाड्यानंतर भोसरीतील आखाड्यात नामांकित पहिलवानाच्या कुस्त्या व्हायच्या. त्यामुळेच इतर गावांच्या तुलनेत उजवी कामगिरी करणाऱ्या भोसरीचे नाव ‘बारा गावे दुसरी, तेव्हा एक गाव भोसरी’ असे अभिमानाने घेतले जाते.

- भानुदास फुगे, भोसरी

रूढी-परंपरा जपणारे संस्कारक्षम गाव म्हणजे भोसरी होय. व्यक्तीच्या कर्तृत्त्वाला सलाम करणारे आणि कौतुकाची थाप देणारे भोसरी गाव आहे. समाजामध्ये कोणत्याही प्रकारे दरी निर्माण होऊ न देणारे भोसरीगाव इतर गावांसाठी एक आदर्श निर्माण करणारे आहे. समाजात एकोप्याचा संदेश देत एकोप्यानेच चालणारे भोसरी गाव आहे.

- मनोज जगताप, बॅंक अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT