Pair of Bulls Sakal
पिंपरी-चिंचवड

Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकोबांच्या पालखीरथाला मोरे, झिंजुर्डे यांची बैलजोडी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान येलवाडी येथील शेतकरी सुरेश दिगंबर मोरे यांना आणि पिंपळे सौदागरमधील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या बैलजोडीस मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान येलवाडी येथील शेतकरी सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या-खासदार आणि पिंपळे सौदागरमधील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा -सोन्या या बैलजोडीस मिळाला आहे.

संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, अजित मोरे, भानुदास महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालखी रथास बैलजोडी जुंपण्याचा मान मिळाला. यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील विविध भागातील इच्छुक शेतकरी संस्थानकडे अर्ज करतात. संस्थानकडे १८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन, संस्थानचे विश्वस्त मंडळ, पालखी सोहळा प्रमुख यांनी बैलजोडीची पाहणी केली. बैलाचा रुबाबदारपणा, त्यांचा रंग व इतर गुण पाहिले. त्यानुसार १८ पैकी दोन शेतकऱ्यांच्या बैलजोडी निवडण्यात आल्या. संस्थानने देऊळवाड्यात बुधवारी (ता. ३१) अंतिम दोन बैलजोडीची निवड जाहीर केली. यात मोरे आणि झिंजुर्डे यांच्या बैलजोडीस मान मिळाला.

याबाबत सुरेश मोरे म्हणाले, ‘गेल्या चार वर्षापासून संस्थानकडे अर्ज करत होतो. यावर्षी बैलजोडी जुंपण्याचा मान मिळाला. घरातच सेवा करण्याची संधी मिळाली याचा आनंद झाला आहे. सोन्या-खासदार ही जोडी धायरी येथील एका शेतकऱ्याकडून खरेदी केली आहे.’

पिंपळे सौदागर येथील महेंद्र झिंजुर्डे म्हणाले, ‘शेतकरी आणि वारकरी संप्रदायात वाढल्याने पांडुरंगाची, तुकोबांची सेवा करावी, असे वाटत होते. तसेच चुलते विणेकरी आहेत. यंदा संत तुकाराम महाराजांच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा, अशी इच्छा होती.

सलग तीन वर्ष अर्ज केले होते. सेवा करण्याची संधी मिळाल्याने आनंद मिळाला. कर्नाटक येथून बैलजोडी खरेदी केली आहे. पिंपळे सौदागर येथील नागरिकांना हा मान मिळाल्याने आनंद झाला आहे.’

तसेच चौघडा गाडीसाठी चिंबळी येथील शेतकरी सत्यवान ज्ञानेश्वर जैद यांच्या बैलजोडीस संस्थानने मान दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT